Crime News : प्रश्न विचारला म्हणून संपातली पत्नी, नवऱ्याच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड

Crime News : पतीने विचारलेल्या प्रश्नामुळे पत्नी इतकी संपातली होती की तिने थेट नवऱ्यासोबत हाणामारी करण्यास सुरुवात केली. यानंतर पतीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पत्नीला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे

Updated: Jan 30, 2023, 06:52 PM IST
Crime News : प्रश्न विचारला म्हणून संपातली पत्नी, नवऱ्याच्या चेहऱ्यावर फेकले अ‍ॅसिड

Crime News : अनेकदा पती पत्नीमधील वाद होत असल्याचे आपण पाहिलं असेल. काही वेळा ते आपासातच सोडवले जातात. तर कधी नवरा बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीला मध्यस्ती करावी लागते. पण हे वाद मिटवले जातात. मात्र उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) घडलेल्या एका घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये (Kanpur) एका पत्नीने तिच्या पतीवर ॲसिड हल्ला (Acid Attack) केला आहे. पतीने विचारलेल्या एका प्रश्नावरुन पत्नीला राग आला. त्यानंतर भांडणास सुरुवात झाली आणि वाद वाढला. यानंतर संतापाच्या भरात पत्नीने पतीवर ॲसिड हल्ला केला.

रागाच्या भरात पत्नीने फेकले अॅसिड 

उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात एका पतीने आपल्या पत्नीला रात्री उशिरा घरी येण्याचे कारण विचारल्यामुळे हा वाद सुरु झाला. पतीने विचारपूस केल्यानंतर भांडणाला सुरुवात झाली. यानंतर रागाच्या भरात पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. मात्र, आरोपी महिलेने पतीवर नशा करत असल्याचा आणि मारहाणीचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्नीला अटक केली आहे.

28 जानेवारी हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे. डब्बू गुप्ताअसे पीडित पतीचे नाव आहे.  डब्बू गुप्ताकानपूरमधील कलेक्टरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोपरगंज भागात राहतो. "शनिवारी, रात्री 12:30 वाजता माझी पत्नी घरी आली तेव्ही मी  फक्त तिला एवढ्या रात्री कुठून आलीस? असे विचारले. यावरून वाद सुरू झाला. पत्नीने मला मारहाण केली तेव्हा मीही तिला मारहाण केली. याचा राग आल्याने तिने बाथरूममध्ये ठेवलेले अॅसिड आणून माझ्या चेहऱ्यावर फेकले," असे डब्बूने सांगितले.

आरोपी पत्नीला अटक

या हल्ल्यामुळे डब्बूचा संपूर्ण चेहरा जळाला आहे. यानंतर डब्बूने कलेक्टरगंज पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी डब्बूला उर्साला रुग्णालयात दाखल केले. आरोपी पत्नी पूनमला रविवारी संध्याकाळी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पोलीस तपासात दोघांमध्ये याआधीही मारामारी आणि भांडण होत होते. नवऱ्याच्या मनमानीमुळे पत्नीही मनमानी करत असे. डब्बू गुप्तासा अमली पदार्थांचे व्यसन होते. त्यामुळे वैतागून पत्नीने हे कृत्य केले असावे असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.