Noida Wife Swapping Case : नवऱ्याने दारु पाजली आणि मग म्हणाला की माझ्या मित्रासोबत जाऊन झोप आणि मी त्याचा पत्नीसोबत.. बायकोची अदला बदलची घटना एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडली आहे. वाइफ स्वॅपिंगबद्दल आपण अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि बिपाशा बासू यांच्या Ajnabee चित्रपटात आपण पाहिलं होतं. पण घटना सत्यात उतरली ते उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये...(wife swapping husband asks wife to sleep with friend in noida Crime News in marathi )
एका महिलेने त्याचा नवरा, नवऱ्याच्या मित्र आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांकडे गंभीर आरोप केले आहेत. पीडित महिलेने सांगितलं की, पतीने जबरदस्ती दारु पाजली आणि मित्रासोबत झोपण्यासाठी दबाव टाकला. तिने या गोष्टीला नकार दिल्यावर पतीने सगळे संबंध तोडण्याची धमकी दिली.
एवढंच नाही तर सासूवरही तिने गंभीर आरोप केले आहेत. तिने पोलिसांना सांगितलं की, ''सासू टोमणे मारायची, तू तुझ्या पतीला आनंदी देऊ शकतं नाही. त्यामुळे पतीच्या मित्राच्या पत्नीकडून पतीला आनंद कसा द्यायचा हे शिकून घे. यासाठी सासू माझ्यावर दबाव टाकायची.''
यापेक्षा भयानक म्हणजे कोणत्या दिवशी पतीसोबत सेक्स करायचा आणि कधी नाही हेदेखील सासू ठरवत होती, असंही या पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं.
महिलेने सांगितलं की, गेल्या वर्षी 18 एप्रिलला ती पतीसोबत सेक्टर 75 मधील एका फ्लॅटमध्ये पार्टीसाठी गेली होती. त्याठिकाणी तिच्या पतीचा मित्र त्याच्या बायकोसोबत आला होता. त्यावेळी या पार्टीत तिला जबरदस्ती दारु पाजण्यात आली आणि नवऱ्याने मित्रासोबत झोपायला जबरदस्ती केली. ''मी त्याचा बायकोसोबत झोपतो असंही तो म्हणाला. या प्रकाराला वाइफ स्वॅपिंग म्हणतात आणि हे तुला करावं लागेल, नाही तर मी तुझ्याशी सगळे संबंध तोडून देईल. ''
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महिलेचा नवरा, नवऱ्याचा मित्र, त्याची बायको, सासू, सासरे, मेहुणी या सगळ्यांना हुंडाबळीसह अनेक कलमांखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.