मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये सरकारी काम कशी होतात हे पाहिलांत तर तुम्हाला धक्काच बसेल. एका महिलेला आपल्या दिव्यांग पतीसाठी सरकारी ऑफिसच्या चकरा मारत आहे. मात्र त्यासाठी तिची होणारी धडपड ही विचित्र आहे. या स्त्रिला नवऱ्याला चक्क पाठीवर उचलून घेऊन जाव लागलं आहे.
या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. पतीच्या दिव्यांगत्वाचे सर्टिफिकेट बनवण्यासाठी महिलेवर अशी वेळ आली. तिला चक्क सीएमओ ऑफिसमध्ये पतीला अशा अवस्थेत घेऊन जावलं लागत आहे.
Mathura: A woman was seen carrying her differently-abled husband on her back to office of chief medical officer to obtain a disability certificate, says' we have no access to a wheel-chair or a tricycle. We went to many different offices but still have not got the certificate.' pic.twitter.com/nqtHetCOtZ
— ANI UP (@ANINewsUP) April 4, 2018
दिव्यांग सर्टिफिकेटसाठी मारले चक्कर महिलेने सांगितलं की, अपघातात तिच्या नवऱ्याचे पाय कापले गेले. तीन वर्षापूर्वी या महिलेच्या पतीचा अपघात झाला आणि त्यानंतर दिव्यांग सर्टिफिकेटसाठी सीएमओ ऑफिसच्या फेऱ्या गेल्या कित्येक दिवसांपासून खेटा घालत आहे. मात्र अधिकारी याबाबत कोणतंही काम करण्यास तयार नाही.
कलेक्टरला भेटल्यानंतर महिलेला नवऱ्याचा फोटो काढण्यासाठी सांगितलं तेव्हा व्हीलचेअर मिळाली नाही. आणि नवऱ्याला घेऊन जाण कठीण होतं. पण महिलेने न डगमगता आपल्या नवऱ्याला पाठीवर उचलून घेतलं आणि घेऊन गेली. तिला या अवस्थेत बघून सर्वचण गोंधळले. महिलेचं म्हणणं आहे की गेले कित्येक दिवस ती ऑफिसच्या फेऱ्या मारत आहेत.