मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक रेल्वे पोलिस आणि मोटरमन यांनी जीव देण्यासाठी निघालेल्या एका महिलेला वाचवला आहे. हा व्हिडीओ मुंबईतला आहे. यावेळी घटनास्ठळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांना हा प्रसंग व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केला.
या व्हिडीओत रेल्वे पोलिस फोर्सचे एएसआय रवींद्र सानप आणि मोटरमन यांनी या महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबईतील भायखळा रेल्वे स्टेशनवर हा थरारक प्रसंग घडला. हा भयानक व्हिडीओ आरपीएफनं ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की, कृपया असं पाऊल उचलू नका. आपल्याला फक्त एकच आयुष्य मिळतं, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. असा संदेशही सोबत दिला आहे.'
#HeroicAct
In a nail biting rescue,#RPF ASI Ravindra Sanap and motorman saved a woman attempting suicide by walking towards a local train on the same track at Byculla Railway Station.
We request all to not take such drastic steps.
We only get one life, make the most of it. pic.twitter.com/xRzgz1knXu— RPF INDIA (@RPF_INDIA) August 29, 2022
व्हिडीओत एक महिला जेव्हा आत्महत्या करण्यासाठी धावत्या लोकलच्या दिशेनं धावत होती. तेव्हा स्टेशनवर उपस्थित असलेले प्रवासी ओरडू लागले आणि त्या महिलेला थांबवण्यास सांगत होते. तरी देखील ती महिला धावत्या लोकलच्या दिशेनं धावत होती. रेल्वे अगदी काही फुटांवर आल्यानंतर सर्वांना आता ही महिला रेल्वेखाली जाणार असंच वाटलं.
मात्र, तितक्यात आरपीएफचे एएसआय यांनी धावत जाऊन तिला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केलं. सुदैवानं मोटरमन यांनी लगेच ती लोकल थांबवली आणि त्या महिलेता जीव वाचला. त्यानंतर स्टेशनवर असलेले प्रवासी महिलेच्या दिशेनं धावले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.