अश्लील इशारे करणाऱ्या 'महिलांना' अटक

दिल्लीतील रोहिणी भागात ही घटना घडली आहे.  

Updated: Dec 5, 2018, 07:41 PM IST
अश्लील इशारे करणाऱ्या 'महिलांना' अटक  title=

नवी दिल्ली | महिलांकडे पाहून वेडेवाकडे इशारे करणाऱ्या तरुणाला अटक केल्याची घटना याआधी आपण अनेकदा ऐकली आहे. पण अश्लील हालचाल करणाऱ्या 'महिलांना' अटक झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकली नसेल, अशी घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. दिल्लीतील रोहिणी भागात ही घटना घडली आहे. ये-जा करणाऱ्या पुरुषांकडे पाहून या महिला अश्लील हालचाल करायच्या. याचा त्रास स्थानिकांना होऊ लागल्याने, त्यांनी सदर प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांनी या ठिकाणा वरुन ४ महिलांना अटक केली. या महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची शंका पोलिसांना आहे. पण त्याबद्दल कोणतीही कबुली महिलांनी दिलेली नाही. याप्रकरणी सविस्तर चौकशी सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याच्या गुन्ह्याखाली या महिलांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.