मुंबई : नवरात्रौत्सव सुरू झाला आहे. रविवारी घटस्थापना झाली असून आता हा उत्सव सगळीकडे उत्साहाने साजरा होत आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये अतिशय भक्तीमय वातावरण आहे. गुजरात, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात हा उत्सव गरबा खेळून हा सण साजरा केला जातो.
नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात तरऊणाईची धूम पाहायला मिळते. पारंपरिक वेशात तरूणाई गरब्यावर ठेका धरताना दिसता. यावेळी तरूणाईत ट्रेंड आहे तो हाऊडी मोदी, चंद्रया 2 सारख्या विषयांचा. हे विषय तरूणाई गरब्यातून प्रमोट करताना दिसते.
#WATCH Gujarat: A dance group from a 'garba class' in Surat, perform garba dance wearing helmets, in a bid to create awareness among people about the usage of helmets. They say "We wanted to encourage people to wear helmets. This is for our own safety." (29.09.2019) pic.twitter.com/gvtUGMZsYD
— ANI (@ANI) September 29, 2019
सुरतमध्ये एका 'गरबा क्लास' डान्स ग्रुपने हेलमेट घालून गरबा केला. यातून त्यांनी ट्रॅफिकचा सर्वात महत्वाचा नियम अधोरेखित केल्याचं दिसत आहे. लोकांनी हेल्मेट घालूनच गाडी चालवावी या महत्वाच्या विषयावर जनजागृती करताना दिसले.
Gujarat: Women pose with body paint tattoos, depicting PM Narendra Modi and US President Donald Trump, during preparations for #Navratri and Raas Garba, in Surat. (29.09.2019) pic.twitter.com/rdE2HzwlJY
— ANI (@ANI) September 29, 2019
तर दुसरीकडे चक्क मोदींच्या हाऊडी प्रोग्रामला प्रमोट केलं आहे. गेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हाऊडी येथे झालेली चर्चा महत्वाची होती. यावर टॅटू काढून गरब्यामध्ये खेळताना दिसले.