World Contraception Day 2022: भारतात किती पुरुष Condom वापरतात, जाणून घ्या

भारतात 10 पैकी इतके पुरुष शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करतात, तुम्हाला माहितीय का? 

Updated: Sep 26, 2022, 08:39 PM IST
World Contraception Day 2022: भारतात किती पुरुष Condom वापरतात, जाणून घ्या  title=

मुंबई : देशभरात आज 26 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक गर्भनिरोधक दिन (world contraception day)  साजरा करण्यात येत आहे. सुरक्षित लैंगिक संबंधांवर भर देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त आज आपण देशात 10 पैकी किती पूरूष कंडोमचा (Condom) वापर करतात याची माहिती जाणून घेऊयात. 

'हा' दिवस का साजरा केला जातो? 
जागतिक गर्भनिरोधक दिवस (world contraception day) दरवर्षी 26 सप्टेंबरला साजरा केला जातो. या दिवशी महिला आणि तिच्या जोडीदाराला प्रजनन क्षमतेबद्दल योग्य निर्णय घेता यावे. किंबहूना ते अधिक सक्षम करण्यासाठी जन्म नियंत्रण पद्धतींबद्दल जागरूकता वाढविणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे. 2007 पासून हा दिवस साजरा करण्यात सुरुवात करण्यात आली होती. 
 
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे काय सांगतो? 
भारतात कुटुंब नियोजन ही महिलांची जबाबदारी असल्याची मानसिकता अजूनही आहे. ज्यात बदल होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपण आपले वागणे आणि सामाजिक नियम बदलणे आवश्यक आहे. 

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 2019-2021 (National Family Health Survey)  चा अहवाल सांगतो की शहरी भागात महिला नसबंदीचे प्रमाण सतत वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच भारतातील 10 पैकी एक पुरुष कंडोम वापरतात. तर 10 पैकी चार महिला गर्भधारणा टाळण्यासाठी नसबंदी करतात, ही फारच धक्कादायक आकडेवारी आहे.