Crime News: बिहारमध्ये (Bihar) घरगुती वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाच्या गुप्तांगासहित संपूर्ण शरिरावर चाकूने वार करत जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तरुणाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या वहिनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. पण भाऊ मधे पडल्यानतंर त्याने त्याच्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
बभनौली गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ मजूर आहेत. मजुरी करुन दोघेही आपलं पोट भरत घर चालवतात. दरम्यान घऱात खर्चासाठी पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
पीडित मनोज साह याने दिलेल्या माहितीनुसार, आमचं एकत्रित कुटुंब असून सगळे एकत्रच राहतात. पण आपला छोटा भाऊ दिपक नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने वाद घालत असतो. घरातील खर्चासाठी मनोज काहीच पैसे देत नव्हता. याच कारणामुळे मनोजची पत्नी चंद्रावती देवीने दिपकशी बोलणं बंद केलं होतं.
आरोपी दीपक मंगळवारी रात्री मद्यावस्थेत घऱी आला आणि आपल्या वहिनीशी भांडू लागला. मोठा भाऊ मनोज याने मध्यस्थी करत विरोध केला असता त्याने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल दाखल करण्यात आलेली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.