मुंबई : केंद्र सरकारनं पासपोर्ट जारी करण्यात एक मोठा बदल केलाय. हा बदल १ जूनपासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. परदेश मंत्रालय आणखी एका कॅटेगिरीमध्ये पासपोर्ट लॉन्च करणार आहे. सोबतच आता तुमचा पासपोर्टचा आता तुम्ही राहण्याच्या पत्त्याचा पुरावा म्हणूनही वापर करू शकणार नाही. कारण परदेश मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार, पासपोर्टच्या बुकलेटवर शेवटच्या पानावर तुमच्या पत्याचा उल्लेख नसेल. त्याऐवजी या पानावर एक बारकोड दिसेल जो स्कॅन केल्यानंतर अधिकाऱ्यांना माहिती मिळू शकेल.
या डिटेल्स पासपोर्ट बुकलेटच्या नव्या सीरिजवर असेल. यासोबतच आता पासपोर्ट आणखी एका रंगामध्येही उपलब्ध होणार आहे. सध्या परदेश मंत्रालयाकडून तीन रंगांत पासपोर्ट देण्यात येतो. सरकारी अधिकाऱ्यांसाठी पांढऱ्या रंगात, डिप्लोमॅटससाठी लाल रंगात तर सामान्य जनतेचा पासपोर्ट निळ्या रंगात दिला जातो. सामान्य जनतेला सध्या ECNR आणि ECR या दोन कॅटेगिरीमध्ये पासपोर्ट दिला जातो... आता ECR कॅटेगिरीला केशरी रंगात पासपोर्ट दिला जाणार आहे. यामुळे लोकांना आणि अधिकाऱ्यांना इमीग्रेशन चेकिंगसाठी कमी वेळ लागू शकेल, असा दावा केला जातोय.
आता पासपोर्ट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील. तसंच आता लहान मुलं आणि सिनिअर सिटीझनला पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात १० टक्के सूट मिळणार आहे.