मोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव

नरेंद्र मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे.

shailesh musale Updated: Mar 15, 2018, 07:52 PM IST
मोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव title=

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी वायएसआर काँग्रेस पार्टी शुक्रवारी एनडीए सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार आहे. वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी याबाबत पत्र लिहून विरोधी पक्षांना समर्थन मागितलं आहे. 

वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय वी सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा महासचिवांना नोटिस दिली आहे. हा मुद्दा उद्या कारवाईत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी वायवी सुब्बा रेड्डी यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं की, जर गरज पडली तर त्यांचा पक्ष देखील अविश्वास प्रस्तावाला समर्थन देईल. सीएम चंद्रबाबू नायडू यांनी  गुरुवारी विधानसभेत म्हटलं की, जर गरज पडली तर आपण अविश्वास प्रस्तावाला समर्थन करु. मग हा प्रस्ताव कोणीही आणावा. आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे एकमेकांचे विरोधी पक्ष आहेत.