Zomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसे

Zomato increased Platform Fees: झोमॅटोवर दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करत असतात. मात्र आता यासाठी  ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. नेमकी किती वाढ झाली आहे ते जाणून घ्या...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 22, 2024, 09:26 AM IST
Zomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसे title=

Zomato increased Platform Fees News in Marathi: स्विगी नंतर तिचा स्पर्धक झोमॅटोवरुन जेवण ऑर्डर करणे ही महाग झालयं. जर तुम्हीसुद्धा Zomato वरून जेवण ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. झोमॅटोने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला असून कंपनीने प्लॅटफॉर्म फी च्या मागे 25 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रति ऑर्डर 5  रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. कंपनी आपल्या मार्च तिमाहीतील कामगिरीची घोषणा करणार आहे. पण त्याआधीच कंपनीने शुल्कवाढीची घोषणा केली आहे. 

झोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्लॅटफॉर्म शुल्क 2 रुपये वाढवले होते आणि त्यानंतर ते 3 रुपये केले. ऑगस्ट 2023 मध्ये, कंपनीने नफा कमावण्यासाठी प्लॅटफॉर्म फी 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर ही यामध्ये दोनदा वाढ करण्यात आली. झोमॅटो दरवर्षी अंदाजे 85 ते 90 कोटी ऑर्डर घेते. केवळ एक रुपया सुविधा शुल्क आकारल्याने कंपनीच्या उत्पन्नात 85 ते 90 कोटी रुपयांचा फरक पडतो. कंपनीचे हे पाऊल यशस्वी ठरले तर कंपनीला  यातून भरपूर नफा मिळण्यास मदत होईल. 

दरम्यान गेल्यावर्षी तिमाहित कंपनीला 186 कोटींचा तोटा झाला होता. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, या वर्षी जून 2023 पर्यंत कंपनीने 71 टक्के तिमाही नफा कमावला आहे. झोमॅटोने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो नफा झाल्याची माहिती समोर आली.  तसेच झोमॅटोने Interity Legends सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  या अंतर्गत, कंपनीने एका शहरातील टॉप रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ दुसऱ्या शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे ऑर्डर स्वीकारायची. मात्र, सध्या ही सेवा नुकतीच थांबवण्यात आली. कंपनीच्या वेबसाइटवर 'लीडर्स' वर क्लिक करून, तुम्ही ही सेवा तात्पुरती निलंबित करण्यात आल्याची माहिती पाहू शकता आणि आम्ही लवकरच तुमच्या सेवेत येऊ अशी सूचना देखील पाहायला मिळत आहे. 

शेअर बाजारात नफा

झोमॅटो कंपनीने डिसेंबर तिमाहीत महसुलात 30 टक्के वाढ नोंदवली आहे. सध्या कंपनीचे वार्षिक उत्पादन 2,025 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमतही लक्षणीय वाढते. गेल्या काही महिन्यांत कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी सुमारे 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भागीधारकांना 236.61 टक्के परतावा मिळाला होता. सध्या झोमॅटोच्या एका शेअरची किंमत 189 रुपयांच्या जवळपास आहे.