RCB vs CSK, MS Dhoni : आज IPL 2023 चा 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात रंगणार आहे. या रोमांचक सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आयपीएलमध्ये या दोन्ही संघांची एकसारखीच कामगिरी दिसून आली आहे. दोन्ही संघांने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन्ही संघांकडे चार गुण आहेत. तर चेन्नई गुणतालिकेत सहाव्या तर बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे. या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी यांनी महेंद्र सिंग धोनीच्या दुखापतीबाबत मोठा खुलासा केला आहे. एमएस धोनी हा आजचा सामना खेळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर सविस्तर...
बुधवारी, 12 एप्रिलला चेन्नई (RCB vs CSK) विरुद्ध राजस्थान यांच्यात सामना पार पडला. चेन्नईचा या सामन्यात शेवटचा गोलंदाजवर पराभव स्विकारावा लागला. यानंतर स्टीफन फ्लेमिंग याने धोनीच्या दुखापतीबाबत माहिती दिली धोनीच्या दुखापतीमुळे त्याला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धावताना त्रास जाणवत होता.
वाचा : IPL 2023 दरम्यान BCCI ची मोठी घोषणा, जय शाह यांनी ट्विटमधून दिली माहीती...
मात्र आज धोनीच्या या दुखापतीबाबत माहिती देताना चेन्नई संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी धोनीच्या यांनी सांगितले की, एमएस धोनीला बऱ्याच दिवसापासून त्रास होत आहे. तरीही तो शक्य होईल तेवढं सामना जिंकणाचा प्रयत्न करत असतो. एमएस धोनी आता ठीक होत आहे. पण आजच्या RCB vs CSK सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आरसीबीविरुद्ध खेळणे ही नेहमीच मोठी संधी असते. कारण गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली आहे. या सामन्यासाठी चेन्नईचे खेळाडू सज्ज आहे. अशी माहिती मायकेल हसी यांनी दिली आहे.
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी या संघाचा मुख्य खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धा सुरू होताच एमएस धोनी जखमी असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. कारण सामन्यापूर्वीच एमएस धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी हा लंगडताना दिसून येत आहे. त्यानंतर गेल्या सामन्यात देखील चेन्नईची फलंदाजी सुरु असताना धोनी लंगडताना दिसून आला होता. त्यामुळे एमएस धोनी सामन्यातून बाहेर पडणार की काय? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात एमएस धोनी RCB विरुद्धात मैदानात उतरणार असल्याचे चेन्नई संघाचे सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी यांनी स्पष्ट केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एमके लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, व्हॅन पारनेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, विजयकुमार विशाक
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मगाला, एमएस धोनी, तुषार देशपांडे, थिक्षाना, आकाश सिंग