close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवी मुंबईतील घरांसाठी सिडकोची बंपर लॉटरी

14 हजार 800 घरांसाठी पहिल्या 15 दिवसांत 35 हजार अर्ज आले.

Updated: Sep 3, 2018, 09:53 PM IST
नवी मुंबईतील घरांसाठी सिडकोची बंपर लॉटरी

नवी मुंबई: सिडकोने नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या परिसरात सामान्यांसाठी घरांची बंपर लॉटरी काढली आहे. या घरकुल योजनेसाठी सिडकोला चांगला प्रतिसाद मिळतोय. 

14 हजार 800 घरांसाठी पहिल्या 15 दिवसांत 35 हजार अर्ज आले. 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. प्रथमच अर्ज भरण्याची सेवा ही ऑनलाइन करण्यात आली होती. अर्ज भरताना नागरिकांना काही अडचणी येत आहेत. मात्र, टोल फ्री क्रमांक आणि सिडको च्या संकेतस्थळावरून शंकाच निरासन करण्यात येत असल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आली.