आंजर्लेच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल

 राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अांजर्ले गावात चक्क बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या.

Updated: Nov 3, 2017, 10:35 AM IST
आंजर्लेच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल title=

दापोली : राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अांजर्ले गावात चक्क बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या. कार्तिकी उत्सवानिमित्त अांजर्ले येथील समुद्र किना-यावर ही स्पर्धा घेण्यात आली.

या शर्यतीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यतीप्रकरणी गुन्हा दाखल. विश्वास महाडिक सुर्वेंसह काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंजार्ले गावात झाली होती शर्यत.

या शर्यतींमध्ये अनेक बैलांना जखमा झाल्या. दापोलीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी लाडघर, सालदुररे, मुर्डी येथील बैलगाड्यांसह तालुक्यातील बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.

विशेष म्हणजे सरकारची तसंच कोर्टाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच ही स्पर्धा भरवण्यात आलेली होती. बंदी आदेशाचं उल्लंघन करणा-या स्पर्धा आयोजकांवर आणि स्पर्धेत सहभागी झालेल्यांवर आता काय कारवाई होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. हा कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन असल्याने आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.