अभिनेत्री अदिती सारंगधरने पुन्हा एकदा आपल्या पोस्ट पार्टम डिप्रेशन डिलिव्हरीचा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून जाणाऱ्या महिलेला अनेकदा आपल्या जोडीदार आणि मुल यांच्याकडून थोड्या ब्रेकची गरज असतो. पण हा ब्रेक किती जणांना कळतो. तसेच हा ब्रेक महिलांना किती महत्त्वाचा हे या लेखात समजून घेणार आहे.
अदिती मुलाच्या जन्मानंतर पोस्ट पार्टम डिप्रेशमधून जात होती. यावेळी तिला घराबाहेर पडण्याची देखील भीती वाटत होती. अशा परिस्थिती तिला एका मालिकेत काम मिळालं. शुटिंगला एक महिना असताना अदितीच्या नवऱ्याने तिला जयपुरचं विमानाचं तिकिट दिलं. आणि तुला माझ्या आणि माझ्या मुलाकडून ब्रेकची गरज असल्याचं सांगितलं. पत्नीला इतक्या सुंदर पद्धतीने समजून घेणे किती गरजेचं आहे. हे अदितीच्या नवऱ्याने आपल्या कृतीतून सांगितलं.
पोस्टपार्टम डिप्रेशन ही अवस्था गर्भवस्थेत किंवा बाळाच्या जन्मानंतर महिलेला जाणवू लागते. पोस्ट पार्टम डिप्रेशन हा एक मानसिक आजार आहे. या परिस्थितीत महिलेच्या विचार करण्यावर, कृती करण्यामध्ये नकारात्मक परिणाम जाणून येतो. सुरुवातीच्या टप्प्यात तणाव आणि थकवा, गोष्टी स्पष्टपणे सांगण्यामध्ये अडथळा निर्माण होतो.