Parenting Tips : पालकत्व हा अतिशय रिवॉर्डिंग आणि चॅलेंजिंग जॉब आहे. मुलांना वाढवताना अनेक गोष्टींचा विचार करायला हवा. पालकांच्या काही ठराविक चुका मुलांच्या संगोपनात अडथळा निर्माण करु शकतात. या चुका तुम्हाला मुलांच संगोपन करत असतानाच अनुभवातून शिकता येणार आहेत. पण त्यामध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांना क्वालिटी टाईम देणे, त्यांना स्वातंत्र्य देऊन जबाबदारी शिकवणे म्हणजे खऱ्या अर्थाने पालकत्व आहे. पण अनेक पालक मुलांना खूप चांगल्या पद्धतीने वाढवतात पण काही चुका पालकांना महागात पडतात.
अनेकदा पालक कळत नकळत मुलांना गरजेपेक्षा जास्त सांभाळतात. पालक मुलांना प्रत्येक गोष्टीपासून बचाव करतात. अति काळजी आणि अति सुरक्षितत ठेवणे हे मुलांना सोशल होण्यापासून रोखत असते. पालकांचा हा ओव्हरप्रोटेक्टिव अप्रोच मुलांच्या भविष्यातील वाढीसाठी घातक ठरु शकतो.
पालक मुलांच्या अभ्यासाकडे किंवा त्यांच्या ओव्हरऑल ऍकेडमिक करिअरवर अधिक फोकस करतात. सध्याच कॉम्पेटेटिव जग असल्यामुळे मुलांना अभ्यासात तरबेजच असणे गरजेचे असते, असे पालकांना वाटते. पण या सगळ्यामध्ये मुलांच्या Life Skills कडे मात्र सहज दुर्लक्ष होतं. मुलांना अभ्यासासोबतच फिजिकल डेव्हल्पमेंट शिकवणे गरजेचे असते.
पालक अनेकदा मुलांना इतकं महत्त्व देतात की, स्वतःच्या खासगी गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामुळे पालकांमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य, नकारात्मकता, स्ट्रेस यासारख्या गोष्टी वाढतात. आणि कळत नकळत या सगळ्याचा त्रास पुन्हा एकदा मुलांवरच होतो.
काही पालक मुलांवर कडक शिस्त लावतात. कठोर नियमांनी त्यांचं बालपण पूर्णपणे कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. आणि हाच पर्याय मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अस पालकांना वाटतं. नियम हे मुलांसाठी कायमच महत्त्वाचे ठरतात. पण कठोर शिक्षा यामुळे पालक आणि मुलांचं नातं चुकीच्या वळणावर जाऊ शकते. मुलांमध्ये पालकांबाबत राग, चिड आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात.
अनेक पालक कळत नकळत आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करतात. मग ते अभ्यासात असो किंवा त्यांच्या वागण्या आणि खाण्यात असो. पालक कायमच कम्पॅरिझन मोडमध्ये असतात. यामुळे पालक अनावधानाने मुलांना अपशब्द बोलतात याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे पालकांनी तुलना करणे टाळणे अत्यंत गरजेचे असते.