त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत

Black Spots on Skin : त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं.   

नेहा चौधरी | Updated: Nov 14, 2023, 01:41 PM IST
त्वचेवर काळे डाग असतील तर सावधान, 'या' गंभीर आजाराचे संकेत title=
Be careful if there are black spots on the skin this is a sign of serious illness ignore these symptoms blood sugar level
Diabetes Symptoms on Skin : धावपळीची जीवनशैली, वाढतं वय आणि खाण्यापिण्याची चुकीची पद्धत यामुळे मानवाला अनेक आजार आपल्या विळख्यात घेतो आहे. अगदी लहान मुलांनाही आजकाल गंभीर आजाराने गाठल्याचं दिसून येत आहे. जर तुमच्या त्वचेवर काळे, लाल, पिवळे डाग दिसतं असेल तर हे गंभीर आजाराचं लक्षण आहे. World Diabetes Day निमित्त आज आम्ही तुम्हाला मधुमेहाची लक्षण्यांबद्दल सांगणार आहात. (Be careful if there are black spots on the skin  this is a sign of serious illness ignore these symptoms blood sugar level )
 
जेव्हा रक्तातील साखर वाढल्यास तुम्ही अनियंत्रत मधुमेहाने ग्रस्त आहात, हे स्पष्ट आहे. त्यामुळे अशावेळी रक्तातील साखर नियंत्रित करणे गरजेचे असतात. नाहीतर त्वचेवर काळे डाग तुमच्या सुंदरतेला डाग लावतील. त्याशिवाय त्वचेवर खाज देखील सुटते.

मधुमेह असल्यास त्वचेवर दिसतात 'ही' लक्षणं 

तुमच्या त्वचेवर काळे डाग दिसू लागल्यास हे मधुमेहाचं लक्षण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
तुमच्या मानेवर किंवा काखेत काळे चट्टे किंवा ठिपके दिसत असेल, शिवाय त्यांना स्पर्श केल्यावर मऊ वाटत असतील म्हणजे तुमच्या शरीरातील रक्तातील साखर वाढली आहे असं तज्ज्ञ सांगतात. 
वैद्यकीय भाषेत याला 'अॅकॅन्थोसिस निग्रिकन्स' असं म्हणतात. रक्तातील इन्सुलिन वाढल्याची हे महत्त्वाचं संकेत आहे. 
मधुमेह झाल्यास त्वचेला खाज सुटते. 
जर तुम्हाला खूप मुरुम येत असतील किंवा पुरळ येत असेल तर हेदेखील मधुमेहाचे संकेत आहे.
त्वचेवर पिवळे, लाल किंवा तपकिरी डाग हे प्री-डायबिटीजची लक्षणं असून याला 'नेक्रोबायोसिस लिपोडिका' असं म्हणतात.
तुमच्या शरीरात साखर वाढल्यास जखमा बऱ्या होण्यासाठी जास्त काळ लागतो. शिवाय त्यामुळे नसा खराब होतात आणि रक्ताभिसरणातही समस्या उद्धवू शकते.
तुमच्या त्वचेत जास्त कोरडेपणा जाणवत असेल तर हे मधुमेहाचं संकेत असू शकतं. 
 

रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा हे उपाय 

नियमित व्यायाम करा
कार्ब्सच्या सेवनावर तब्या ठेवा
फायबरचे सेवन जास्तत जास्त करा
भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड राहा
कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असणारे अन्नाचं सेवन करा
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यावर भर द्या
 
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)