Signs Of Intelligence In Children's: मुलांचं संगोपन करणे ही खूप मोठी जबाबदारी असते. मुलांचा सर्वांगिण विकास होणे अतिशय महत्त्वाचा असतो. अशावेळी पालकांचे वागणे आणि आजूबाजूचा परिसर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. प्रत्येक पालक आपल्या मुलाला चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षण देण्याच्या प्रयत्नात असतात.
अशावेळी पालकांचं मुलांच्या सर्व हालचालींवर विशेष लक्ष असतात. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा पालक विचार करतात. कारण मुलांच्या वागणुकीवरून नेमकं त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे हे कळतं. पण अनेकदा पालकांना वाटतं की, मुलांच्या या सवयी चुकीच्या आहेत. पण तसं नाही, मुलांच्या काही सवयी त्यांच्या तल्लख बुद्धीचं संकेत असतात.
वारंवार बोलवूनही मूल तुमचे ऐकत नसेल आणि स्वतःच्याच विश्वात व्यस्त असेल तर काळजी करू नका. हे आवश्यक नाही की, मूल तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे, असे देखील होऊ शकते की मूल त्याच्या कामात इतके मग्न आहे की त्याने तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. हे दर्शविते की मुलामध्ये लक्ष केंद्रित करण्याची खूप चांगली क्षमता आहे.
अनेक मुलांना एका जागी शांत बसता येत नाही. अनेकांनी विरोध करुनही तो इकडे तिकडे फिरत राहतो आणि आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करतो. मुलामध्ये अशी सवय असणे म्हणजे त्याला सगळ्या गोष्टींची उत्सुकता असते. कुतुहलाने भरलेली मुले कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक जाणून घेण्यास सक्षम असतात आणि गोष्टी लवकर समजतात.
अनेक मुलांना स्वतःची कामे करायला आवडतात. पालकांना मुलाला मदत करायची आहे पण तो नकार देतो. मुलाची ही सवय त्याचा आत्मविश्वास दर्शवते. हे दर्शवते की तुमच्या मुलामध्ये स्वतःहून काहीतरी करण्याचा आत्मविश्वास आणि धैर्य आहे. मुलांना स्वतःलाच सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या.
अनेक मुले खूप बोलतात आणि प्रत्येक गोष्ट कथेप्रमाणे सांगायला आवडतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा पालकांना असे वाटते की, मूल खोटे बोलू लागले आहे. किंवा ते इतर मुलांच्या तुलनेत अधिक बोलतात. तुम्हाला तुमचं मुलं इततर मुलांच्या तुलनेत वेगळे वाटू शकते. या सवयीतून कळते की, तुमच्या मुलाचे मन खूप सर्जनशील आहे, ज्यामुळे त्याला सर्वकाही समजून घेणे आणि इतरांना समजावून सांगणे आवडते.