दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना 'या' गोष्टी टाळा आणि 5 गोष्टी आवर्जुन करा

Diwali Lakshmi Pujan 2023 : दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना काही गोष्टी कटाक्षाने टाळा आणि आवर्जुन कराल. ज्यामुळे घरात कायम राहिल लक्ष्मीचा वास. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 10, 2023, 07:04 PM IST
दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना 'या' गोष्टी टाळा आणि 5 गोष्टी आवर्जुन करा title=

Lakshmi Pujan Importance : पाच दिवसांच्या दिवाळी या सणात नरक चतुर्दशीनंतर लक्ष्मीपूजन हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे मानले जाते. लक्ष्मीपूजनासाठी विधी आणि पूजा हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशावेळी लक्ष्मी देवीच्या मूर्तीविषयी अनेक गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. पूजाकरताना काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत तर काही ठराविक 5 गोष्टी आवर्जुन केल्या पाहिजेत. कारण यामुळे तुमच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहणार आहे आणि घरातील प्रत्येकाची भरभराट होणार आहे. 

'या' गोष्टी आवर्जून टाळा

  • तुळशीला विष्णूची लाडकी म्हटली जाते आणि तिचा विवाह भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाशी केला जातो. या संदर्भात, ती देवी लक्ष्मीची सून आहे. म्हणून देवी लक्ष्मीला अर्पण करताना तुळस आणि तुळशीच्या बिया अर्पण करु नये. असे केल्यास देवी लक्ष्मी नाराज होईल. 
  • लक्ष्मीपूजन करताना दिव्याची ज्योत लाल रंगाची आहे याची खात्री करून घ्या. याशिवाय देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला दिवा ठेवू नका, उजव्या बाजूला ठेवा कारण भगवान विष्णुला प्रकाशाचे प्रतिक मानले जाते. भगवान विष्णुची लक्ष्मी पत्नी आहे त्यामुळे पूजा करताना कायम डाव्या बाजूला ठेवा.
  • देवी लक्ष्मी विवाहित आहे, त्यामुळे तिला चुकूनही पांढरे फूल अर्पण करू नका. लक्ष्मीदेवीची पूजा करताना लक्ष्मीला फक्त लाल आणि गुलाबी फुलं अर्पण करावीत.
  • लक्ष्मीची मूर्ती पांढऱ्या गालिच्यावर ठेवू नका. तसेच पूजा करताना पांढर्‍या किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरणे टाळा.
  • अशीही एक मान्यता आहे की माता लक्ष्मीची पूजा करताना भगवान विष्णूचीही पूजा करावी, कारण आई लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पती-पत्नी आहेत.

या गोष्टी आवर्जुन करा 

  • लक्ष्मीपूजनाच्यावेळी नेहमी गणपती आणि सरस्वती देवीची पूजा करावी. 
  • गणपती आणि सरस्वती यांचे एकत्रितरित्या पूजा करावी. 
  • देवी लक्ष्मीची क्रोध मुद्रा असलेली मूर्ती किंवा तसबीर पूजेला काय घरी देखील ठेवू नये. त्यामुळे स्मित हास्य असलेली मूर्ती पूजेच्यावेळी ठेवा. यामुळे वातावरण प्रसन्न राहते. 
  • लक्ष्मी देवी आणि श्रीविष्णूंच्या तसबिरीत लक्ष्मी देवी श्रीविष्णूंच्या डाव्या बाजूस असावी यामुळे कृपादृष्टी राहिल. 

यंदा दीपोत्सव म्हणजेच दीपावलीचा सण रविवार, १२ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, दिवाळीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्या तिथीला (अमावस्या तिथी 2023) साजरा केला जातो. या दिवशी गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत यावेळी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे, हे आम्ही लेखात सांगणार आहोत. नोव्हेंबर महिन्याचा पहिला प्रदोष व्रत या तारखेला पाळला जाईल, तिथी आणि पूजा करण्याची पद्धत लक्षात ठेवा.

दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त

या वर्षी दिवाळी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5.40 ते 7.36 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर पूजा करून तुम्ही सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकता.