पिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो

Parenting Tips : हल्ली मुलांना आवडीचा पदार्थ विचारला तर तो जंक फूडपैकीच एक असतो. लहानपणापासूनच मुलांना चुकीच्या पदार्थांची चटक लागते अशावेळी 5 सवयींच्या मदतीला लावा हेल्दी फूडची सवय.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 24, 2024, 12:49 PM IST
पिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो title=

Parenting Tips : लहान मुलांचे आरोग्य, शारीरिक आणि मानसिक पातळीवर उत्तम असावे यासाठी पालक प्रयत्नशील असतात. लहानपणापासूनच मुलांच्या आहारात पोषकतत्त्वांचा समावेश करण्याकडे पालकांनी लक्ष द्यावे. पण आताची मुलं ही जंकफूड्स, पास्ता, स्नॅक्स आणि पॅकेज फूडमध्ये जास्त अडकले आहे. अशामुळे मुलांना हेल्दी पदार्थांची सवय लावणं हा पालकांसमोर मोठा टास्क असतो. अशावेळी खालील 5 सवयी तुम्हाला मदत करतील. 

पालकांच्या ताटातील पदार्थांकडे असतं लक्ष 

लहान मुलं अनेकदा आपल्या घरातील वडिलधाऱ्या लोकांना किंवा आई-वडिलांप्रमाणे वागत असतात. अगदी मुलांच्या खाण्याच्या सवयी देखील अशाच असतात. इंटरनेशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यूट्रिशन ऍण्ड फिजिकल ऍक्टिविटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हेल्दी फूडसाठी पालकांनीच मुलांचा आदर्श व्हावा. जेव्हा पालक मुलांनी हेल्दी खावं अशी अपेक्षा करतात तेव्हा पालकांनी देखील आपल्या ताटात त्या पदार्थांचा समावेश करावा. दिवसभरात एक ते दोन वेळा मुलांसोबत बसून फळे खावीत. तसेच ताटा हिरव्या भाज्या, कडधान्य, कोशिंबीर अशा पदार्थांचा समावेश असावा. 

स्वयंपाकघरात मुलांचाही समावेश 

मुलाना लहानपणापासूनच स्वयंपाक घरात सहभागी करुन घ्या. एवढंच नव्हे तर भाजी खरेदी करणं आणि बाजी निवडणं यासारख्या कामांमध्येही मुलांना गुंतवून घेणं गरजेचं आहे. 
अभ्यासात असे दिसून आले आहे की, मुलांना स्वयंपाकाच्या कामात सहभागी करून घेतल्याने त्यांना नवीन गोष्टी करून पाहण्यात अधिक रस निर्माण होतो. याद्वारे मुलांना जेवणाचे हेल्दी पर्याय निवडण्याचा विचार मिळतो.. जर्नल ऑफ न्यूट्रिशन एज्युकेशन अँड बिहेवियरमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जे मुले घरी अन्न तयार करण्यास मदत करतात ते फळे आणि भाज्यांकडे अधिक आकर्षित होतात. 

हेल्दी फूडला द्या आकर्षित ट्विस्ट 

हेल्दी फूड हे कायमच बोअरिंग असतात, असा मुलांचा समज असतो. अशावेळी पालकांची जबाबदारी आहे की, मुलांना हेल्दी फूड आकर्षित पद्धतीने बनवून देणे. जसे की, मेथीच्या पराठ्यांचा फ्रँकी सारखा वापर करणे. तसेच रंग-बिरंगी फळे आणि भाज्या मुलांना आकर्षित करतात पण त्यांना अनोख्या पद्धतीने सादर केले पाहिजे. कारण कोणताही पदार्थ पहिला डोळ्यांनी पाहिला जातो. 

आहारात आवडीच्या पदार्थांचा समावेश 

मुलांना अगदी लहान वयातच वेगवेगळ्या पदार्थांची ओळख करुन द्या. तसेच ऋतुनुसार आहारात बदल करा आणि तो बदल मुलांना दाखवून द्या. सिझनल फळं मुलांच्या डब्यात देण्यास सुरुवात करा. एवढंच नव्हे तर डबा देताना मुलांना एक आवडीचा पदार्थ द्या. जेणे करुन मुलांना नवीन आणि जुनं असं सगळंच खाताना आनंद होईल. एवढंच नव्हे तर मुलांना आपण काय खातो आणि त्याचा शरीरावर कसा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो, हे देखील मुलांना पटवून द्या.