Chickpea Dosa Recipe: मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? बनवा काबुली चण्याचा चविष्ट डोसा, जाणून घ्या रेसिपी

South Indian Food Recipe: मसाला डोसामध्ये रेगुलर बटाटयाची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर काबुली चण्याचा चविष्ट डोसा बनवू शकता.   

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 6, 2024, 01:15 PM IST
Chickpea Dosa Recipe: मसाला डोसा खाऊन कंटाळा आलाय? बनवा काबुली चण्याचा चविष्ट डोसा, जाणून घ्या रेसिपी  title=
Photo Credit: Freepik

How to make masala dosa: साऊथ इंडियन पदार्थ खायला कोणाला आवडत नाही. डोसा, उत्तपा, वडा, इडली हे पदार्थ तर हमखास खाल्ले जातात. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत हे पदार्थ कधीही खाल्ले जातात. डोसा सांबार आणि नारळ किंवा शेंगदाणा चटणी बरोबर खाल्ल्यास एक प्रोटीनयुक्त पदार्थ ठरतो. पण जर तुम्हाला त्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल आणि वेगळी चव हवी असेल तर तुमच्यासाठी आम्ही वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. नेहमीच्या बटाटयाची भाजी डोसामध्ये खाण्यापेक्षा तुम्ही वेगळं सारण बनवू शकता. तुम्ही काबुली चण्याच्या सारणाचा चविष्ट डोसा बनवू शकता. 

लागणारे साहित्य 

 

  • मूग डाळ - 250 ग्रॅम
  • उडदाची डाळ - 250 ग्रॅम
  • तांदूळ - अर्धा किलो
  • आले - २ इंच तुकडा
  • कढीपत्ता- 6-7
  • कोथिंबीर 
  • मीठ - चवीनुसार
  • छोले - 500 ग्रॅम
  • बेकिंग सोडा - एक चिमूटभर
  • हळद, गरम मसाला, हिंग - आवश्यकतेनुसार

हे ही वाचा: Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी

जाणून घ्या कृती 

  • मूग डाळ, उडीद डाळ, मसूर आणि तांदूळ एक ते दोन तास भिजत ठेवा. छोले वेगळे भिजवून घ्या. जर तुम्हाला तांदूळ घेयचे नसतील तर तुम्ही त्यात क्विनोआ घालू शकता.
  • सर्व गोष्टी भिजल्यावर छोले सोडून मिक्सरमध्ये घेऊन त्यात आले, कढीपत्ता, मीठ आणि पाणी घालून मिक्स करा. 
  • अशाप्रकारे तुमचे डोसा पीठ तयार आहे.
  • भिजवलेले छोले उकडून घ्या. चिमूटभर बेकिंग सोडा घालून उकडा, म्हणजे चणे मऊ होतील.
  • तेलात मोहरी, जिरा, तिखट, सुंठ, हिंग आणि कढीपत्ता घाला.

हे ही वाचा: थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी

  • त्यात उकडलेले चणे मिक्स करून त्यात हळद व मीठ घालावे.
  • गरम मसाला आणि कोथिंबीर घाला आणि चणे हलके ठेचून परता. २ ते ३ मिनिटे शिजू द्या. काबुली चण्याचे सारण तयार आहे.
  • तव्यावर पाणी शिंपडून पुसून त्यात एक चमचा तूप किंवा तेल घाला.
  • त्यावर डोसा पिठात पसरवा आणि काबुली चण्याचे सारण भरून ठेवा.
  • डोसा छान खरपूस भाजल्यावर दुमडून प्लेटमध्ये काढून घ्या.  
  • गरम गरम डोसा चटणी सोबत खा.