Holi 2024 : घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करा धुळवडीसाठी नैसर्गिक रंग! ना साइड इफेक्ट ना कोणता त्रास

Holi 2024 Organic Colors : अवघ्या काही दिवसांवर रंगांचा सण आला आहे. होळीच्या सणासाठी मार्केट सजलं आहे. केमिकलयुक्त आणि त्वचेला हानीकारक असं रंग बाजारात दिसतात. पण यंदा घरच्या घरी धुळवडीसाठी घरच्या घरी नैसर्गिक रंग तयार करा. 

नेहा चौधरी | Updated: Mar 17, 2024, 11:08 AM IST
Holi 2024 : घरच्या घरी अशा पद्धतीने तयार करा धुळवडीसाठी नैसर्गिक रंग! ना साइड इफेक्ट ना कोणता त्रास title=
How To Make Organic Colours for Holi at Home in Marathi Natural Handmade Gulaal Made Of Flowers & Fruits

How To Make Organic Colours for Holi at Home in Marathi : देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रंगांचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. विविध आकर्षित असे रंग, पिचकारी आणि मजा मस्तीचे करण्यासाठी वस्तूंनी दुकानं होळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी सज्ज झाली आहेत. बाजारापेठ्यांमध्ये केमिकलयुक्त Chemical Mix Colours) आणि आपल्या त्वचेला हानीकारक असे रंग मिळतात. फाल्गुन महिना आला की फुलांनी निसर्ग सजला जातो. पळसाच्या फुलांनी झाडं बहरली की समजायचं होळीचा सण जवळ आला आहे.  (How To Make Organic Colours for Holi at Home in Marathi Natural Handmade Gulaal Made Of Flowers & Fruits)

पूर्वीच्या काळी पळसाच्या फुलांपासून होळीचा रंग तयार केला जायचा आणि नैसर्गिक रंगांपासून होळी खेळली जायची. कालांतराने वेगवेगळे रंग (Eco-Friendly Colours) बाजारात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर असायचा. यामुळे अनेकांच्या त्वचेला आणि केसांना हानी पोहोचायची. काही वर्षांपासून बाजारात आता नैसर्गिक रंग मिळायला लागले आहेत. पण तेही आपल्यासाठी किती चांगली आहे, हे सांगता येणार नाही. या रंगांसाठी आपण पैसे मोजतो. 

पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी बजेटमध्ये नैसर्गिक रंग कसं तयार करता येतात, त्याबद्दल सांगणार आहोत. या रंगांमुळे तुमची होळी आनंदी तर होईलच शिवाय त्या रंगांच्या वापरामुळे त्वचेला फायदा होईल. ऑरगॅनिक रंग (Organic Colours) कसं तयार करायचे ते पाहूयात. 

लाल रंग

यासाठी रंग लाल चंदन किंवा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून तुम्ही तयार करु शकता. लाल चंदन वाटून त्याची पावडर बनवून तयार करा. लाल गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वाळवा आणि त्यांची पूड करून त्यात चंदनाची पावडर मिक्स करा. अशा प्रकारे तुमचा लाल रंग तयार. त्याशिवाय लाल जास्वंदाच्या फूलांपासूनही तुम्ही लाल रंग तयार करु शकता. त्यासाठी जास्वंदाच्या फूलाची पावडर पिठासोबत मिक्स करा.

गुलाबी रंग 

आता गुलाबी रंगासाठी तुम्ही जो लाल रंग बनवला आहे त्यात थोड गव्हाचं पीठ मिक्स करा. 

पाण्याचा लाल रंग

तुम्ही रंगांसोबतच पाण्यासोबतही खेळली जाते. अशावेळी लाल रंगाच पाणी तयार करण्यासाठी डाळिंबाची साल पाण्यात टाकून उकळा आणि हे पाणी रात्रभर ठेवून द्या. सकाळपर्यंत तुमचं लाल रंगाच पाणी तयार. 

पिवळा रंग

पिवळा रंग तयार करणे तर अगदी सोप आहे. मुलतानी मातीच्या पावडमध्ये हळद पावडर मिक्स केल्यास तुम्हाला पिवळा गुलाल मिळतो. तुम्ही थेट हळद पावडचा उपयोग होळीसाठी करु शकता. त्याशिवाय झेंडूच्या फुलांपासूनही पिवळा रंग तयार होतो. त्यासाठी फुलं वाळवून घ्या. त्यानंतर ती फुलं बारीक करुन त्यात हळद, चंदन, बेसन मिक्स करुन पिवळा रंग तयार होतो. 

हिरवा

पुदिना, धणे  कडुलिंब आणि पालकाची पाने उन्हात वाळवून त्यानंतर ते बारीक करु घ्या. तुमचा हिरवा रंग तयार. जर या गोष्टी पाण्यात उकळून ठेवल्याने हिरव्या रंगाच पाणी तयार होतं. 

 निळा

निळा रंग तयार करण्यासाठी, तुम्हाला हिबिस्कसची फुलं उन्हात वळवून ती मिक्समधून बारीक करुन घ्या. 

नारंगी रंग

नारंगी रंग तयार करण्यासाठी तुम्ही केशर पाण्यामध्ये रात्रभरासाठी ठेवा. आता हे पाणी उकळून घ्या. जेव्हा पाणी थंड होइल त्याचा वापर होळी खेळण्यासाठी करा. त्याशिवाय पळसाच्या फुल वाळवून ते बारीक केल्यास नारंगी रंग तुम्हाला मिळतो. 

ब्राउन कलर

कॉफी पावडरचा वापर करून ब्राउन रंग मिळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा रंग जात नाही म्हणून त्यात मुलतानी माती मिक्स करायला विसरू नका. 

नैसर्गिक रंग आणि गुलाल यांचं फायदे

ऍलर्जी असलेल्या लोकांनाही या रंगांचा धोका नसतो. 
हा रंग डोळ्यात किंवा तोंडात गेल्यावरही हानी पोहोचत नाही. 
नाक, कान आणि घशालाही कुठलीही इजा होत नाही.