फटाके फोडताना भाजलं तर काय करावं? वापरा 'या' टिप्स निशाणही दिसणार नाहीत

फटाके लावताना काहीवेळा हात, पाय, तोंड भाजण्याचे सुद्धा अपघात घडतात. तेव्हा फटाके फोडताना काही अपघात झाले तर त्यावर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत जाणून घेऊयात. 

पुजा पवार | Updated: Oct 27, 2024, 06:12 PM IST
फटाके फोडताना भाजलं तर काय करावं? वापरा 'या' टिप्स निशाणही दिसणार नाहीत title=
(Photo Credit : Social Media)

How to treat firecracker burn : दिवाळीमध्ये फटाके फोडणं अनेकांना आवडतं. मात्र जनजागृती मोहीम राबवूनही फटाक्यांमुळे होणारे अपघात दरवर्षी घडत असतात. फटाके लावताना काहीवेळा हात, पाय, तोंड भाजण्याचे सुद्धा अपघात घडतात. तर फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊन अस्थमा, ब्राँकायटिस आणि न्यूमोनिया यांसारखे पूर्वीपासून असलेले आजार देखील बळावतात. 

आजकाल लहान मुलं फटाक्यांना घाबरत नाहीत. फुलबाजीपासून ते मोठ्या बॉम्बपर्यंत सर्व फटाके फोडताना दिसतात. फटाके फोडणे हा त्यांच्यासाठी एक्साइटमेंटचा विषय असतो. मात्र फटाके फोडताना सावधानता बाळगली नाही तर अपघात घडण्याची शक्यता सुद्धा असते. तेव्हा फटाके फोडताना काही अपघात झाले तर त्यावर प्रथमोपचार कसे करावेत याबाबत जाणून घेऊयात. 

फटाक्यांमुळे दुखापत झाल्यास काय करावे?

1. फटाक्यांमुळे भाजल्यास जखमेवर ताबडतोब थंड पाणी टाकावे आणि जळलेल्या जागेवर अँटीसेप्टिक क्रीमही लावावी. 

2. जर तुम्हाला थोडेसे भाजले असेल तर प्रभावित भागावर तुळशीच्या पानांचा रस लावावा. यामुळे जळजळ कमी होईल आणि भाजल्याचे निशाण सुद्धा राहणार नाहीत. पण जर जखम गंभीर असेल तर याचा वापर करणे टाळावे आणि लगेचच डॉक्टरांकडे धाव घ्यावी. 

3. फटाक्यामुळे तुम्ही भाजला असाल तर त्यावर नारळाचे तेल नारळाचे तेल लावा. नारळाच्या तेलात कुलिंग इफेक्ट असतो ज्यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळतो. तसेच जखम बरी झाल्यावरही तुम्ही त्यावर नारळाचे तेल लावले तर भाजपचे डाग सुद्धा निघून जातील. 

हेही वाचा : यंदाच्या दिवाळीत तेलाने नाही तर पाण्याने पेटवा दिवे, घरच्या घरी कसे बनवायचे?

 

4. भाजलेल्या ठिकणी तुम्ही कच्च्या बटाट्याचा रस सुद्धा लावू शकता. हा रस खूप थंड असतो ज्यामुळे जळजळ शांत होते आणि आराम मिळतो. 

5. फटाक्यांमुळे त्वचा भाजल्याने जर किरकोळ जळजळ होतं असेल तर लगेचच प्रभावित भागावर थंड पाणी टाका किंवा हात थंड पाण्याखाली ठेवा. तुम्ही प्रभावित भागावर कोल्ड क्रीम सुद्धा लावू शकता यामुळे जळजळ, सुजम, वेदना होण्याचा धोका कमी होतो. तसेच जळलेल्या भावर कधीही बँडेज लावू नये.  

डोळ्यांना दुखापत झाली तर काय कराल? 

अनेकदा फटाके फोडताना निष्काळजीपणामुळे डोळ्यांनाही जखम होते. अशावेळी नेत्रतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फटाक्यांमुळे जर डोळ्यांना काही इजा झाली तर डोळे स्वच्छ कापसाच्या पॅडने झाकून ताबडतोब रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावे. तसेच डोळ्यात लहान कण गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत  आणि नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.