International Women's Day2024 :फिरायला जायचा प्लॅन करताय ? महिलांनो आज 'इथं' फुकटात फिरा

जागतिक महिलादिनानिमित्त जगभरात महिलांच्या कर्तृत्त्वाचा गौरव करण्यात येतो आणि तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं, पण तुम्हाला माहितेय का जागतिक महिलादिनानिमित्त भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे महिलांना पैसे भरावे लागत नाही, चला तर  मग जाणून घेऊयात. 

Updated: Mar 8, 2024, 11:50 AM IST
International Women's Day2024 :फिरायला जायचा प्लॅन करताय ? महिलांनो आज 'इथं' फुकटात फिरा title=

फिरायला जायचा प्लॅन करायचा म्हटलं की , महिला वर्गाला आधी पैशांची जमवाजमव करावी लागते, पण तुम्हाला माहितेय का जागतिक महिला दिनानमित्ताने 2019 मध्ये संस्कृती मंत्रालयाद्वारे एक निर्णय घेण्यात आला. या  निर्णयानुसार फक्त भारतीयच नाही तर विदेशी पर्यटक महिलांना ही 8मार्च ला दिल्लीतील ऐतिहासिक ठिकाणं मोफत पाहता येतात.

ताजमहाल


जर तुमचा फिरायला जायचा प्लॅन असेल किंवा तुमच्या घरातील महिलांना बाहेर फिरायला पाठवायचा प्लॅन असेल तर तुम्ही आग्र्याच्या ताजमहालची निवड करू शकता. आग्र्याचा ताजमहाल पाहण्य़ास तुम्हाला गेटवर 50 रुपये शुल्क आकारलं जातं आणि जर तुम्हाला ताजमहाल पुर्ण पाहायचा झाल्यास तुम्हाला 200 रुपये शुल्क आकारलं जातं. मात्र खास महिला दिनानिमित्त दरवर्षी 8 मार्चला ताजमहाल फिरण्यास महिला पर्यटकांना कोणतेही शुल्क द्यावं लागत नाही. भारतीय तसेच विदेशी पर्यटक महिला या ठिकाणाला मोफत भेट देऊ शकतात.

लाल किल्ला


भारतात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत, मात्र देशातील आणि परदेशातील पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे लालकिल्ला. लाल किल्ला पाहण्यासाठी देश आणि जागतिक पातळीवर पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. हाच लाल किल्ला पाहण्यासाठी 8 मार्चला महिलांनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. एरव्ही लाल किल्ला पाहायचा झाल्यास  सोमवार ते शुक्रवार प्रत्येकी एका व्यक्तीस 60 रुपये शुल्क आकारले जाते. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी 80 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र महिलादिनानिमित्ताने महिला पर्यटकांना लाल किल्ला फिरण्यास  कोणतेही शुल्क आकारले जात लागत नाही.

कुतूबमिनार


भारतीय स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणजे दिल्लीची कुतूबमिनार. लाल विटांनी साकारलेला हा मिनार परदेशी पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा विषय ठरतो.  कुतूबमिनारला भेट द्यायची असल्यास भारतीय पर्यटकांना 40 रुपये शुल्क आकारले जातात तर परदेशी पर्यटकांना 500 रुपये शुल्क आकारले जातात. मात्र महिला दिनाचं औचित्य साधत भारत सरकारकडून दरवर्षी 8 मार्चला महिला पर्यटकांसाठी कुतूबमिनार पाहण्यास कोणतेही शुल्क घेतले लागत नाही. त्यामुळे जर तुम्ही महिला दिनानिमित्त बाहेर फिरायचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.  फक्त यंदाच्याच नव्हे, तर दरवर्षी महिला दिनाच्या निमित्तानं या एकाहून एक कमाल ठिकाणी गेलं असता महिलांकडून पैसे आकारले जात नाहीत. त्यामुळे तुम्हीही इथे येण्याचा प्लॅन एकदातरी कराच.