Kitchen Hacks In Marathi: घर सांभाळणे खूप कठिण असते. कधीकधी कामाच्या व्यापात आपले स्वयंपाकघराकडे दुर्लक्ष होते. अनेकदा आपण एक-दोन महिन्यांचे रेशन एकदाच भरुन ठेवतो. मात्र अनेकदा असं होतं की दमट हवेमुळं डब्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या तांदळात व डाळीत किडे लागतात. त्यामुळं तांदुळ फेकून द्यावे लागतात त्यामुळं नुकसान होतं. अशातच हे नुकसान थांबवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. थंड हवामान असो किंवा पावसाचे वातावरण डाळ-तांदळांना बुरशी लागते. त्यामुळं डाळ-तांदुळ कसे स्टोअर करायचे याच्या काही टिप्स जाणून घेऊया.
डाळ-तांदुळात जावून बसलेले किडे किंवा तांदळाला किडे लागू नयेत यासाठी त्यात सुकलेल्या लिंबाची पाने ठेवून द्या. त्याच्या गंधाने किडे बाहेर निघतील. फक्त एक लक्षात ठेवा की ही पाने संपूर्णपणे सुकलेली असावीत.
तुमच्या किचनमध्ये असलेला हा मसाला खूप फायद्याचा आहे. तमालपत्र तांदुळ व डाळीतील किड्यांना सहज बाहेर काढतात. त्याच्या सुगंधाने किडे बाहेर येतात. एकदा की तमालपत्र डाळ-तांदळात टाकलं की पुन्हा त्याला किड लागणारच नाही.
लसूणातून येणारी गंध किड्यांना पळवून लावण्यास फायदेशीर ठरते. त्यासाठी तुम्ही डाळ आणि तांदळाच्या डब्यात लसणाच्या कळ्या टाकू शकतात. एकदा की लसणाच्या पाकळ्या सुकल्या की त्या काढून दुसऱ्या लसणाच्या पाकळ्या टाका.
काळी मिरीच्या मदतीने तुम्ही डाळ-तांदळातील किडे पळवून लावू शकता. त्यासाठी तुम्ही काळी मिरी एका कपड्यात बांधून डाळ आणि तांदळाच्या डब्यात ठेवून द्या.
माचिसची डबीदेखील किडे पळवून लावण्यास फार मदतशीर ठरते. यात सल्फरच्या मदतीने किडे पळून जातात. यासाठी तुम्ही माचिसची डब्बी बांधून कंटेनरमध्ये टाकून ठेवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)