Relationship Tips : आचार्य चाणक्य देशातील लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. त्यांनी चाणक्य नितीमधून ज्या गोष्टी मांडल्या त्या आजही तंतोतंत या काळात उपयुक्त पडत आहे. चाणक्य नीतीमधून गेल्या कित्येक वर्षांपासून लिहिलेल्या ज्ञानाची सगळ्यांना मदत होत आहे. चाणक्य नीतिनुसार, स्त्री पुरुषांच्या गुण आणि अवगुणांबद्दल लिहिलं आहे. जे गुण नातेसंबंध अधिक घट्ट होण्यास मदत होतील. या लेखात आपण महिलांचे असे गुण पाहणार आहोत. ज्या गुणांसमोर पुरुषही नतमस्तक होतात.
समजूदार स्त्री
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार,महिला पुरुषांच्या तुलनेनुसार अधिक समजूतदार आणि सौम्य असतात. कोणत्याही गंभीर स्थितीमध्ये स्त्रिया अतिशय सामंजस्याने वागतात. परिस्थितीनुसार यांच्यामध्ये जबरदस्त क्षमता असतात. स्त्रियांचे वय जसे वाढते तशा त्या अधिक समजूतदार होतात.
भावूक असतात
आचार्य चाणक्य यांच्यामते, स्त्रियांमध्ये ममता, मातृत्व, प्रेम अधिक असते. यामुळे त्या पुरुषांपेक्षा सर्वाधिक भावूक असतात. मात्र ही कमकुवत बाजू नाही तर ताकद आहे.
भूक लागते
आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत सर्वाधिक भूक लागते. यामुळे स्त्रियांच्या शरीराची रचना देखील वेगळी असते. तसेच स्त्रियांना फिट राहण्यासाठी सर्वाधिक कॅलरीज हव्या असतात. स्त्रियांना भरपूर आणि पोटभर पौष्टिक आहार लागतो.
शांतपणे काम करणे
घाईघाईने काम करणे हे सैतानाचे काम आहे आणि चूक होण्याची शक्यताही खूप जास्त असते. परंतु जो माणूस संयमाने काम करतो तो अत्यंत वाईट परिस्थितीतही उच्च दर्जाचे काम करतो. अशा परिस्थितीत चाणक्य निती सांगते की, शांतपणे काम करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या तुलनेत संयमी असतात.
धार्मिक स्त्री
धार्मिक स्त्रीमध्ये तिच्या पतीचे नशीब बदलण्याची क्षमता असते. ती नेहमी आपल्या कुटुंबाचे अधर्मापासून रक्षण करते, त्यामुळे घरातील लोकांवर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो. म्हणूनच चाणक्य नेहमी देवाला मानणाऱ्या आणि धर्माचे पालन करणाऱ्या स्त्रीशीच लग्न करण्याचा सल्ला देतात.
सर्वांचा आदर करणे
जर स्त्रीमध्ये योग्य संस्कार असतील तर ती घरात कधीही कलह होऊ देत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंदी कसे ठेवायचे हे त्याला माहीत आहे. एवढेच नाही तर रागाच्या भरातही ती कोणाचाही अनादर करत नाही. अशा स्त्रीशी लग्न केल्याने पुरुषाचे बिघडलेले संबंधही सुधारू लागतात.