Swiggy 2023 : आजकाल लोक कंटाळ आला किंवा काही बाहेरचं खायची इच्छा झाली की हॉटेलमध्ये न जाता घरीच ऑर्डर करतात. त्यासाठी विविध अॅप असून, तर त्यापैकी एक म्हणजे स्विगी आहे. या सगळ्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे की ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यात मुंबईतील एका माणसानं सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. त्या युजरनं 10-20 नाही तर तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण ऑनलाइन मागवलं. याचा खुलासा 'हाउ इंडिया स्विगी'ड इन 2023' या दिली आहे. स्विगीनं गुरुवारी सांगितलं की मुंबईतील एका युजरनं या वर्षी खाण्याची ऑर्डर देण्यात तब्बल 42.3 लाख रुपये खर्च केले.
याशिवाय आणखी एक माहिती समोर आली आहे की स्विगीला 10 हजार पेक्षा जास्तच्या ऑर्डर या चेन्नई, दिल्ली आणि हैदराबादच्या युजर्सकडून मिळाल्या आहेत. इतकंच नाही तर बिर्यानी ही यावेळी आठव्या क्रमांकावर असून तिला सगळ्यात जास्त ऑर्डर मिळाल्या आहेत. बिर्यानी ही सगळ्यात जास्त ऑर्डर मिळणाऱ्या डिशमध्ये टॉपला आहे. स्विगीवर 2023 मध्ये प्रति सेकंदाला 2.5 बिर्यानीच्या ऑर्डर मिळाळ्या आहेत. तर व्हेज बिर्यानीच्या पेक्षा चिकन बिर्यानीच्या ऑर्डर या 5.5 आहे. स्विगीवर यंदाच्या वर्षी बिर्यानीला 40,30,827 वेळा सर्च करण्यात आलं आहे. तर प्रत्येक पाच ऑर्डरनंतर सहावी बिर्यानीची ऑर्डर ही हैदराबादमधून मिळाली. तर एका युजरनं या वर्षात 1,633 वेळा बिर्यानी ऑर्डर केली आहे. तर वर्षभरात रोज चार पेक्षा जास्त बिर्यानी ऑर्डर केल्या आहेत.
नवरात्रीत गुलाबजामच्या ऑर्डर
नवरात्रीत गुलाबजामच्या 77 लाख पेक्षा जास्त ऑर्डर होत्या. तर नवरात्रीच्या नऊ दिवसात शाकाहारी जेवणात सगळ्यात जास्त ऑर्डर या मसाला डोसाच्या होत्या.
हेही वाचा : 'लेकीलाच ठाऊक नाही बापाचा पुरस्कार'; KBC मध्ये सुहानाला देता आलं नाही SRK बद्दलच्या 'या' प्रश्नाचं उत्तर
इडलीवर 6 लाख खर्च
इडली देखील एकदा टॉप रॅंकवर होती कारण हैदराबादच्या एका युजरनं 6 लाख हे फक्त इडलीवर खर्च केले.
बंगळुरु ठरलं केक कॅपिटल
सगळ्यांना आवडणाऱ्या चॉकलेट केकसाठी युजर्सनं तब्बल 85 लाख खर्च केले. तर त्यातीव सगळ्यात जास्त युजर्स हे बंगळुरुचे होते. त्यामुळे बंगळुरु केक कॅपिटल ठरलं आहे. तर व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी भारतात प्रत्येकी मिनिटाला 271 केक ऑर्डर होत होते.