Boyfriend Sickness म्हणजे काय? नात्यातील ही स्थिती कशी हाताळावी?

 Boyfriend Sickness: जेव्हा कोणी एखादे नाते सुरू होते. तेव्हा त्यांच्यातील बंधन अतुट होते. काही आठवडे ते काही महिन्यापर्यंत बॉयफ्रेंड सिकनेस असू शकते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 19, 2024, 03:29 PM IST
Boyfriend Sickness म्हणजे काय? नात्यातील ही स्थिती कशी हाताळावी? title=
Relationship Tips in marathi What Is Boyfriend Sickness Signs Symptoms And Cause

Boyfriend Sickness: बॉयफ्रेंड सिकनेसबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? हा आजार आहे की मानसिक स्थिती असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील ना. तुम्ही कधी तुमच्या अशा मित्राबद्दल ऐकलं आहे का? ज्यांनी अलीकडेच डेट करायला सुरुवात केली आहे आणि ते प्रेमात आंधळे झाले आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांच्याच अवती भोवती फिरते. ते त्यांच्या प्रियकरामध्ये इतके मग्न झाले आहेत की त्यांच्या मित्रांनादेखील वेळ देत नाहीत? अशी परिस्थिती तुम्ही कधी अनुभवली आहे का? किंवा तुम्ही स्वतः अशा परिस्थितीत आहे. 

नवीन नवीन डेटिंग सुरू केल्यानंतर सामान्यतः लोकांमध्ये अशा प्रकारचे वागणे पाहायला मिळते. याला बॉयफ्रेंड सिकनेस असं म्हणतात. बॉयफ्रेंड सिकनेस ही टर्म टिकटॉक इन्फ्लुअन्सरच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यांनी या नवीन नात्यातील वेडेपणा असल्याचे म्हटलं आहे. हा रिलेशनशिपमधला सामान्य टप्पा आहे. जिथे लोक त्यांच्या साथीदाराला पहिली प्राथमिकता देतात. 

या स्थितीला बॉयफ्रेंड सिकनेस जरी म्हणत असले तरी ही मनस्थिती मुलगा किंवा मुलगी या दोघांचीही असू शकते. तज्ज्ञांच्या मते, जोडप्यांसाठी ही स्थिती सामान्य आहे आणि नवीन जोडप्यांमध्ये तो बॉन्ड व प्रेम निर्माण होण्यासाठी गरजेचादेखील आहे. तसेच, बहुतेक प्रकरणांमध्ये हा टप्पा तात्पुरता असतो. 

नात्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा

कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या मानसोपचार विभागाचे प्रोफेसर आमिर यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक नवीन  रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचा मेंदू त्यांच्या जोडीदाराशी बंध तयार करण्यासाठी ओव्हरटाइम काम करतो. अनोळखी व्यक्तीला आयुष्यात महत्त्वाचे स्थान देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

जेव्हा एखादे जोडपे खूप वेळ एकत्र घालवतात तेव्हा त्यांच्यातील बंध अधिक घट्ट होतात आणि यास काही आठवडे ते काही महिने लागू शकतात. एकदा जोडपे एकमेकांशी घट्टपणे जोडले गेले की, ते इतर नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करू शकतात किंवा सोप्या शब्दात, ते एकमेकांच्या मित्रांसोबत सामाजिकता सुरू करू शकतात.