रजनीकांत यांनी आजही जपलंय मराठी भाषेशी खास नातं, नातवंडांना दिलीत मराठमोळी नावे

Rajinikath And Marathi Connection : सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांचा आज  73 वा वाढदिवस. रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रातले आहेत. जाणून घ्या त्यांनी आजही हे महाराष्ट्र प्रेम अनोख्या पद्धतीने जपलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 12, 2023, 11:02 AM IST
रजनीकांत यांनी आजही जपलंय मराठी भाषेशी खास नातं, नातवंडांना दिलीत मराठमोळी नावे title=

Rajinikanth Birthday : वयाच्या 73 व्या वर्षी कुणालाही लाजवेल असा सुपरस्टार रजनीकांत यांचा रुबाब आहे. साऊथ सिनेमांसोबतच जगभरात अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रातले. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे मराठा हेंद्रे पाटील समाजात झाला. आज रजनीकांत यांचा वाढदिवस. या दिवशी आपण त्यांनी आजही जपलेलं मराठी कनेक्शन पाहणार आहोत. 

मराठमोळं नाव 

सुपरस्टार रजनिकांत यांचं शिवाजीराव गायकवाड असं नाव असून आई वडिलांच नाव रामोजीराव गायकवाड आणि जिजाबाई गायकवाड असं आहे. रजनिकांत हे गायकवाड अपत्यांपैकी सर्वात धाकटे अपत्य आहे.  रजनीकांत यांना दोन मुली असून त्यांचे ऐश्वर्या आणि सौंदर्या अशी दोन नावे आहेत. रजनीकांत यांनी आपल्या नातवंडांना अगदी मराठी कनेक्शन असलेलं मराठमोळं नाव दिलं आहे. रजनीकांत यांच्या मुलीने सौंदर्याने दोन मुलांना जन्म दिला. या दोन्ही मुलांची नावे अतिशय मराठमोळी आहेत. 

अशी जपलीय संस्कृती 

रजनीकांत हे आजोबा आहेत. आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यातील प्रेम म्हणजे दुधावरची साय आणि हे नातं आपल्याला इथे देखील अनुभवता येत आहे. रजीनाकांत यांच्या दोन्ही नातवंडांची नावे वीर आणि वेद अशी आहेत. 

वीर नावाचा अर्थ 

सौंदर्याने आपल्या मुलाचे नाव "वीर" असे ठेवले आहे. वीर या नावाचा अर्थ शूर, यौद्धा असं होतं. या दोन्ही नावांना मराठीत अधिक पसंती आहे.

वेद नावाचा अर्थ 

वेद हे मुलांच नाव आहे. जे अतिशय पवित्र मानलं जातं. वेदांशी संबंधित असलेल्या 'वेद' या नावाचा अर्थ आहे पवित्र ज्ञान, धन, अतिशय किंमती, हिंदू धर्मात चार पवित्र ग्रंथ आहेत. यातील एक पवित्र ग्रंथ म्हणजे वेद. 

अशीच काही मराठमोळी नावे आणि अर्थ 

अरुण  - सूर्याचा सारथी 
अद्वैत - अद्वितीय, ब्रह्मदेव व विष्णू यांचे दुसरे नाव 
अंबरीश -आकाशाचा देव , विष्णूचे एक नाव 
अनिरुद्ध -ज्याला प्रतिबंधित करता येत नाही असा धैर्यवान , विष्णू 
आदित्य - सूर्य 
चैतन्य - जीवन, ज्ञान, चेतना 
प्रथमेश -गणपती 
प्रणव - ओंकार 
प्रसाद -देवाचा आशीर्वाद

आणखी काही मुलांची नावे

सिद्धार्थ - गौतम बुद्ध 
सिद्धेश - भाग्यवान, सक्षम
कबीर - महान , संत कबीरांचे नाव 
अजिंक्य -जो कधीही हरत नाही असा 
अच्युत - विष्णू 
अखिलज्ञ - सूर्य 
अनंत - सूर्य 
मिहीर - सूर्य 
ईशान - महादेव 
आरव - हाक , आवाज 
अर्णव - समुद्र 
प्रसन्न - खुश, आनंदी 
उज्ज्वल-प्रकाशमय , सूर्य