Tips to Remove Bitterness of Karela : कारलं आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांना माहीती आहे. पण कारलं खाताना कडू लागते म्हणून अगदी मोठ्यापासून ते लहानपर्यंत कारलं खाताना नाक मुरडतात. कडवटपणामुळे कारले अनेकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांतून बाहेर पडतो. कारले चवीला कडू जरी असले तरी त्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. यामुळे स्किन ग्लो तर होतेच पण रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
पण जर तुमच्या कुटुंबातील लोकांना कारल्याच्या गुणांचा फायदा घेऊन ते खावेसे वाटले तर तुम्ही त्याचा कडूपणा दूर करण्याचा प्रयत्न करू शकता. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही कारल्यातील कडूपणा दूर करू शकता आणि त्यातील पोषक तत्वांचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. या टिप्स वापरून तुम्ही कारल्याची भाजी बनवू शकता आणि लहान मुलंही आवडीने खातील.
कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी प्रथम कारले कापून घ्या. त्यावर मीठ शिंपडा आणि 20 मिनिटे बाजूला ठेवा. कारल्यात मीठ लावून सोडल्याने त्याचा सर्व कडू रस निघून जातो. 20 मिनिटांनंतर तुम्ही कारले बारीक करून भाजी तयार करू शकता. कारल्याला कडू चव लागणार नाही.
कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी चिंचेचा कोळ आणि पाण्याचे द्रावण तयार करून त्यात चिरलेले कारले अर्धा तास भिजत ठेवा. चिंचेचा आंबटपण कारल्याचा कडूपणा कमी करण्यास मदत करते. भाजी बनवण्यापूर्वी चिंचेच्या पाण्यातून कारले काढून स्वच्छ पाण्याने धुवावे. असे केल्याने तुमची भाजी खूप चविष्ट होईल.
कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी प्रथम कारल्याते तुकडे करून लिंबाच्या रसात 15 ते 20 मिनिटे ठेवा. लिंबाच्या रसाचा कारल्याचा आंबटपणा आणि कडूपणा कमी होण्यास मदत होते. भाज्या तयार करण्यापूर्वी कारलं स्वच्छ पाण्याने धुवा.
कारल्याचा कडूपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही ब्लँचिंग पद्धत देखील वापरून पाहू शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळून त्यात चिरले कारले घालून ५ मिनिटे उकळवा. त्यानंतर एका भांड्याच कारले टाकून त्यावर बर्फाचे तुकडे टाका. यानंतर कारल्यातील पाणी काढून टाका आणि भाजी तयार करा.