Vikramaditya Vedic Clock : भारत नाही फक्त संपूर्ण जगासाठी आज एक भेट दिली आहे. पीएम मोदी यांनी काल गुरुवारी 29 फेब्रुवारी रोजी उज्जैनमध्ये विक्रमादित्य वैदिक घड्याळचं लोकार्पण करण्यात आलं. जगातलं हे असं पहिलं घड्याळ असणार आहे जे वैदिक असूनही सर्वसामान्य घड्याळाप्रमाणे त्याला मिनिट आणि तासाचा काटा नसणार आहे तर हे डिजिटल असणार आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे या घड्याळातील एक तास हा 60 मिनिटाचा नसणार आहे. चला तर जाणून घेऊया या घडळ्याविषयी...
1. कशी कळेल वेळ
या घड्याळात इंडियन स्टॅन्डर्ड टाइम (IST) आणि ग्रीनविच मीन टाईम (GMT) सोबतच पंचांग आणि मुहूर्ताविषयी देखील माहिती मिळणार आहे. त्याच्या काही खास 5 गोष्टी जाणून घेऊया.
2. 48 मिनिटांचा एक तास
विक्रमादित्य वैदिक तास हा 48 मिनिटांचा असणार आहे. हे घड्याळ फक्त वेळ नाही तर मुहूर्त, ग्रहण तिथी, शुभ मुहूर्त, पर्व, उपवास, ग्रह-भद्रा स्थिती, योग, सण, सूर्य आणि चंद्र ग्रहणसोबत अनेक गोष्टींची माहिती देणार.
3. जगातलं पहिलं वैदिक घड्याळ
जगात असं घड्याळ कुठेचं नाही. उज्जैनमध्ये असलेल्या या घड्याळची निर्मिती ही 85 फीट टॉवरची करण्यात आली आहे. वैदिक माहिती देणाऱ्या या घड्याळाला संपूर्ण डिजीटल बनवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याचा एक अॅप देखील लॉन्च देखील करण्यात आला आहे.
4. 30 तासाची घड्याळ
या घड्याळ्यात 24 तास नाही तर 30 तास असणार आहेत. हे घड्याळ सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंतची सगळे वेळ दाखवणार आहे.
5.कोणी बणवलं हे घड्याळ
विक्रमादित्य वैदिक घड्याळ हे आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या अॅपचं नाव आरोह श्रीवास्तव आहे. या घड्याळात तुम्हाला हवामानाविषयी देखील माहिती मिळेल. मोहन यादव हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा या घड्याळावर काम सुरु केलं होतं.
6. इंटरनेट आणि जीपीएस कनेक्शन
विक्रमादित्य वैदिक घड्याळ इंटरनेट आणि जीपीएसशी जोडलेलं आहे. तर या घड्याळ्याच्या अॅपला कोणीही डाउनलोड करू शकतं. वॉच टॉवर टेलिस्कोप देखील लावलाय. हे घड्याळ देशातील सगळ्या प्रमुख मंदिरांशी जोडलेलं आहे.