Weight Loss : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाहीये! मग तुमचं काय चुकतंय?

Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही. तुमच्या जेवणात प्रोसेस फूड किंवा साधे कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप जास्त वर खाली होत असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची क्रेव्हिंग होते. 

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2024, 09:50 AM IST
Weight Loss : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाहीये! मग तुमचं काय चुकतंय? title=
Weight Loss Tips Want to lose weight but hunger is not controlled

Weight Loss Tips in Marathi : तरुणी असो किंवा महिला यांना कायम वाटतं आपण स्लिम ट्रिम दिसावं. तर पुरुषांना वाटतं आपली बॉडी एकदम फिट असावी. त्यासाठी वजन कमी करणं किंवा ते नियंत्रणात ठेवणं हे खूप मोठं आव्हान असतं. वजन कमी करण्यासाठी सगळ्यात पहिले आहारावर लक्ष द्यावं लागतं. त्याच्या जोडीला व्यायाम असेल तरच तुमचं वजन कमी होतं किंवा नियंत्रणात राहतं. पण वजन कमी करतोय, डाएट सुरु केलंय पण भूक कंट्रोल (Control) होत नाहीये? मग तुमचं काय चुकतंय याबद्दल सांगणार आहेत फिटनेस ट्रेनर राहुल शेळके. (Weight Loss Tips Want to lose weight but hunger is not controlled ) 

...म्हणून तुम्हाला जास्त खाण्याची क्रेव्हिंग होते!

आपल्याला जास्त खाण्याची क्रेव्हिंग का होते याबद्दल राहुलने सांगितलंय. तो म्हणतो की, तुमच्या जेवणात प्रोसेस फूड किंवा साधे कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप जास्त वर खाली होत असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची क्रेव्हिंग होते. 

जेवताना 'ही' गोष्ट चुकतेय!

राहुल सांगतो की, जर तुम्ही 20 मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये जेवत असाल तरीही भूक आपल्याला जास्त लागू शकते. त्याशिवाय जर तुम्ही कुठल्याही प्रकारची औषधं स्टिरॉइड्स किंवा डिप्रेशन टॅब्लेट घेत असाल तरीही तुम्हाला जास्त भूक लागेत. 

सगळ्यात महत्त्वाच म्हणजे झोप पूर्ण होत नसेल तरीही आपल्याला जास्त भूक लागत असते. शिवाय जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर तुम्हाला जास्त खाण्याची इच्छा होते. जर तुम्ही जास्त तणावात असाल तर तुम्हाला खाण्याचे क्रेव्हिंग होतं. 

हेसुद्धा वाचा - तुम्ही पण भात, चपाती एकत्र खाता? तज्ज्ञ म्हणतात, आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक

खाण्याचे क्रेव्हिंग होऊ नये म्हणून करा 'या' गोष्टी!

तुमच्या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक जेवण्यात हिरव्या भाज्या आणि सॅलडचं प्रमाण वाढवावं. त्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारख वाटत. प्रत्येक जेवण्यात 20-30 ग्रॅम प्रोटीन आपण घेतलं तर त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. पण खूप वेळेला आपल्याला भूक तर लागलेली नसतं पण एखादा पदार्थाबद्दल क्रेव्हिंग होते. 

मग अशावेळल्या तुम्ही उकळलेली अंडी खायला हवीत. पण तुम्हाला उकळलेली अंडी खायची इच्छा नसेल तर याचा अर्थ तुम्हाला भूक लागलेली नाहीत तर तुम्हाला क्रेव्हिंग होतंय. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)