भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...

दिक्षा पाटील | Updated: Aug 13, 2024, 06:33 PM IST
भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? title=
(Photo Credit : Freepik)

Soaked almonds vs soaked peanuts : ड्रायफ्रुट्स किंवा सुकामेवा हा आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. जर त्यातही जर सुकामेवा हा भिजवलेला असेल तर त्यातील सगळे गुणधर्म हे चांगलेच वाढतात. आता हे ड्रायफ्रुट्स रात्रभर पाण्यात भिजवत घाला यानं फक्त त्यातील न्युट्रिएन्ट्स वाढणार नाही तर त्याशिवाय त्यानं किती फायदे होतात ते जाणून घेऊया...

जर तुम्ही एक मुठभर ड्रायफ्रुट्स खाल्ले तर त्यानं फक्त तुमच्यातील ताकद वाढणार नाही तर त्यासोबत फायबर वाढेल आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल देखील कमी होईल. जेव्हा तुम्हाला काही तरी खाण्याची इच्छा होते तेव्हा इतर कोणत्याही गोष्टी खाण्यापेक्षा उदाहरणार्थ कूकीज, चिप्स आणि आरोग्याला हानिकारक अशा गोष्टी खाण्यापेक्षा ड्रायफ्रुट्य खा. त्यानं तुमच्या काही तरी खाण्याच्या क्रेव्हिंग्स देखील जातील आणि पोटही भरेल. 

पीअर-रिव्हीव्ह्यूड जर्नल क्लिनिकल इंटरव्हेंशन्स इन एजिंगनुसार, सुकामेवा आणि सीड्समध्ये अॅन्टिऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यात असा एक गुणधर्म आहे ज्यानं तुम्ही तुमचं स्ट्रेस देखील नियंत्रणात आणू शकतात. ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, फायबर, व्हिटामिन्स आणि मिनरल्स हे सगळे गुणधर्म असतात. हे सगळे न्युट्रिएन्ट्स हृदयासंबंधीत समस्या आणि डायबिटीजवर नियंत्रणात मदत करतो. 

आज आपण भिजवलेल्या बदाम आणि भिजवलेल्या शेंगदाण्यांचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

भिजलेले शेंगदाणे
भिजलेले शेंगदाणे हे पचन्यास अगदी सोपे असतात. त्यामुळे पित्त होत नाही. त्यामुळेत सगळे न्युट्रिएन्ट्स हे तुमच्या शरीराला मिळतात. त्याशिवाय रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील भिजवलेले शेंगदाणे मदत करतात. त्याशिवाय महिलांना टाईप 2 डायबिटीज होण्याची शक्यता देखील कमी होते. हृदयाचे आरोग्य हे खूप चांगले राहते. आणखी एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. इतकंच नाही तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. 

भिजलेल्या बदाम 
भिजवलेले बदाम तुमच्या मेंदूचं आरोग्य चांगलं करण्यासाठी आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय यामुळे ब्रेन सेल्स देखील वाढतात. रोज जर तुम्ही 5-6  बदाम खाल्ले तर तुमची स्मरणशक्ति वाढते. यासोबतच भिजवलेले बदाम खाल्यानं त्वचा खूप चांगली राहते. यात व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असतं. त्यासोबतच हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहतं. यामुळे हार्टअटॅक येण्याची शक्यता देखील कमी होते. वजन कमी करण्यास देखील बदाम खाऊ शकता. 

सगळ्या गोष्टी या नियंत्रणातच असल्या पाहिजे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)