IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

India vs England T20 World 2022 Semi Final LIVE Score: विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे.

IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

IND vs ENG T20 World 2022 Semi-Final LIVE Updates: तिथे 2022 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्याच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला नमवत World Cup च्या Final मध्ये धडक मारली. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध इंगलंड सामन्यावर लागल्या आहेत. भारतानं हा सामना जिंकल्यास जेतेपदासाठी पुन्हा एकदा India Vs Pakistan अशी लढत पाहता येणार आहे. तर, तिथे इंग्लंडचा संघही अॅडलेडमध्ये भारताचा विजयी रथ रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या सामन्यावर पावसाचीही वक्रदृष्टी असल्यामुळे सामन्यात ही एक अडचण नको, असाच सूर क्रिकेटप्रेमी आळवताना दिसत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित सामन्याच्या Live Upates खालीलप्रमाणे... 

 

10 Nov 2022, 15:09 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडियांचं इंग्लंडंसमोर 169 धावांचं आव्हान, भारत : 168/6

विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे. शेवटच्या बॉलवर हार्दीक आऊट 63 धावावर आऊट झाला आहे. 
 
भारत : 168/6

10 Nov 2022, 15:07 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे. शेवटच्या बॉलवर हार्दीक आऊट 63 धावावर आऊट झाला आहे. 
 भारत : 168/6

10 Nov 2022, 15:03 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. रिषभ पंत स्वस्तात बाद झाला आहे. 

10 Nov 2022, 14:58 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  विराट कोहलीनंतर आता हार्दिक पंड्याने अर्धशतक ठोकले आहे. हार्दिकने 29 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलंय. 
भारत : 155/4

10 Nov 2022, 14:54 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  विराट कोहली अर्धशतक करून बाद झाला आहे. कोहली बाद झाल्यामुळे भारताची धावसंख्या आणखीण कमी होण्याची शक्यता आहे. 
भारत : 136/4

 

10 Nov 2022, 14:50 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : विराट कोहलीचं शानदार अर्धशतक, 39 चेंडूत 50 धावा

मोक्याच्या क्षणी विराट कोहलीने ठोकलं अर्धशतक, 39 बॉलमध्ये पुर्ण केलं अर्धशतक 
 

10 Nov 2022, 14:23 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score,T20 World Cup: रशिदने सुर्याला फसवलं! सुर्यकुमार यादव 14 धावावर आऊट

  टीम इंडिया तिसरा धक्का... सलग तीन अर्धशतक ठोकणारा सुर्यकुमार तंबूत परतला

 

10 Nov 2022, 14:22 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडियाचा फॉर्ममध्ये असलेल्या बॅट्समन सुर्यकुमार यादव 14 धावावर आऊट झाला आहे. राशीदच्या बॉलवर तो गंगनचूंबी सिक्स मारताना आऊट झाला आहे. 
भारत : 75/3

 

10 Nov 2022, 14:17 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 62 धावा ठोकल्या आहेत. विराट कोहली चांगला सेट झाला आहे, तर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सुर्या मैदानात उतरला आहे. 
भारत : 62/2 

10 Nov 2022, 14:12 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score : कर्णधार रोहित शर्मा 27 धावांवर बाद