IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

India vs England T20 World 2022 Semi Final LIVE Score: विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे.

IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

IND vs ENG T20 World 2022 Semi-Final LIVE Updates: तिथे 2022 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्याच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला नमवत World Cup च्या Final मध्ये धडक मारली. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध इंगलंड सामन्यावर लागल्या आहेत. भारतानं हा सामना जिंकल्यास जेतेपदासाठी पुन्हा एकदा India Vs Pakistan अशी लढत पाहता येणार आहे. तर, तिथे इंग्लंडचा संघही अॅडलेडमध्ये भारताचा विजयी रथ रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या सामन्यावर पावसाचीही वक्रदृष्टी असल्यामुळे सामन्यात ही एक अडचण नको, असाच सूर क्रिकेटप्रेमी आळवताना दिसत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित सामन्याच्या Live Upates खालीलप्रमाणे... 

 

10 Nov 2022, 07:44 वाजता

IND vs ENG 2nd Semi-Final Latest Updates : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज सेमी फायनलची दुसरी ( Ind vs Eng Semi final) मॅच रंगणार आहे. अ‍ॅडलेडच्या ओव्हल मैदानावर दोन्ही टीम्स एकमेकांना भिडणार आहेत. आजची मॅच जिंकणाऱ्या टीमची लढत फायनलमध्ये पाकिस्तानशी (Pakistan) होणार आहे. आजची मॅच जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या इराद्यानं टीम इंडिया आणि इंग्लंड मैदानात उतरतील. (ICC T-20 World Cup)