IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

India vs England T20 World 2022 Semi Final LIVE Score: विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य असणार आहे.

IND vs ENG Highlights, Semi Final T20 World Cup : टीम इंडियाचा दारूण पराभव, इंग्लंडकडून 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून पराभव

IND vs ENG T20 World 2022 Semi-Final LIVE Updates: तिथे 2022 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्याच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्ताननं न्यूझीलंडला नमवत World Cup च्या Final मध्ये धडक मारली. त्यानंतर आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत विरुद्ध इंगलंड सामन्यावर लागल्या आहेत. भारतानं हा सामना जिंकल्यास जेतेपदासाठी पुन्हा एकदा India Vs Pakistan अशी लढत पाहता येणार आहे. तर, तिथे इंग्लंडचा संघही अॅडलेडमध्ये भारताचा विजयी रथ रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसणार आहे. मुख्य म्हणजे या सामन्यावर पावसाचीही वक्रदृष्टी असल्यामुळे सामन्यात ही एक अडचण नको, असाच सूर क्रिकेटप्रेमी आळवताना दिसत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित सामन्याच्या Live Upates खालीलप्रमाणे... 

 

10 Nov 2022, 14:10 वाजता

IND vs ENG Semi Final LIVE Score :  टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 27 धावांवर बाद झाला आहे. क्रिस जॉर्डनच्या बॉलवर तो कॅच आऊट झाला आहे. 
भारत : 56/2

10 Nov 2022, 13:53 वाजता

IND vs ENG Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 31 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 14  आणि विराट 11 वर खेळतोय 
भारत : 31/1 

10 Nov 2022, 13:43 वाजता

IND vs ENG Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : के एल राहुल ५ धावांवर बाद 

टीम इंडियाची खराब सुरुवात, के एल राहूल 5 धावावर बाद झाला आहे. वोक्सने त्याची विकेट घेतली आहे. 
भारत : 9/1 

10 Nov 2022, 13:41 वाजता

IND vs ENG Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : टीम इंडियाची खराब सुरुवात, के एल राहूल 5 धावावर बाद झाला आहे. वोक्सने त्याची विकेट घेतली आहे. 
भारत : 9/1 

10 Nov 2022, 12:47 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : भारतीय संघाची एकूण कामगिरी पाहता प्लेइंग 11 मध्ये फारसे बदल असतील अशा अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. कारण रोहितनं सुपर 12 फेरीमध्ये झालेल्या 5 पैकी 3 सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नव्हता. उर्वरित दोन सामन्यांमध्ये जे बदल झाले ते फक्त 2 जागांसाठीच होते. आता यावेळी रोहित संघात कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल. यामध्ये ऋषभ पंत की कार्तिक, अक्षर पटेल, दीपक हुड्डा की चहल , आणि ओपनिंग साठी के.एल. राहुलचं स्थान कायम राहणार की तिथेही बदल होणार याकडेच सर्वांचं लक्ष असेल. 

वाचा : IND vs ENG T20 WC: 2 जागा 5 दावेदार; Rohit Sharma सेमीफायनलच्या प्लेईंग 11 मध्ये कोणाला देणार संधी?

 

10 Nov 2022, 12:13 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  भारतीय क्रिकेट इंग्लंडशी दोन हात करत टी20 वर्ल्ड कपच्या Final मध्ये धडक मारण्यासाठी सज्ज झाला आहे. संघातील खेळाडूंची कामगिरी, दुखापतग्रस्त खेळाडूंना सावरण्यासाठीही मेहनत, संघातील उणीवा भरुन काढण्यासाठीची धडपड आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देत संघ टप्प्याटप्प्यानं पुढेही आला आहे. आता फक्त इंग्लंडला नमवलं, म्हणजे T20 World Cup च्या Final चं तिकिट कन्फर्म. (T20 World Cup not a single team won the match after winning the toss in Adelaide Oval will rohit sharma loose ). हे गणित वाटतं तितकं सोपं नाही. कारण, आतापर्यंत Adelaide Oval मध्ये जवळपास 11 टी 20 सामने झाले आहेत. पण, आकडे पाहता निकाल मात्र चकित करणारा आहे. कारण, जो संघ इथे Toss जिंकतो तो सामना जिंकत नाही. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचीच आकडेवारी पाहिली तर, अॅडलेड ओवलमध्ये आतापर्यंत 6 सामने झाले. यामध्ये जे संघ टॉस जिंकले त्यांना सामना गमवावा लागला. भारतीय संघ या मैदानात बांगलादेशविरोधात (Ind vs ban) खेळला. पण, यावेळी टॉस बांगलादेशनं जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाची करण्याचं आव्हान दिलं होतं. 

 

10 Nov 2022, 11:26 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  भारतीय संघाला तुम्हीही देऊ शकता शुभेच्छा... कसं? पाहा... 

10 Nov 2022, 10:49 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : भारताचा संघ पहिल्यांदाच आयसीसीच्या एखाद्या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीशिवाय खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळं माहीच्या तुफानी खेळीशिवाय संघ अपेक्षित कामगिरी करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

वाचा : T20 World Cup : 'या' तुफानी खेळाडूशिवाय भारतीय संघ इंग्लंडविरोधात खेळणार; पहिल्यांदाच त्याची अनुपस्थिती

10 Nov 2022, 10:45 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final : अॅडलेडवर भारतीय संघाची कामगिरी पाहता आकडे Team India चं पारडं जड असल्याचीच बाब अधोरेखित करतात. इथं भारतीय संघानं 30 सामने खेळले असून त्यापैकी 13 सामन्यांमध्ये संघ विजयी ठरला आहे. तर 13 सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. इथं 1 सामना बरोबरीत निकाली निघाला तर, 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. 

10 Nov 2022, 10:30 वाजता

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup 2nd Semi Final :  टीम इंडिया आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत 22 वेळा आमनेसामने आला आहे. यामध्ये भारतीय संघ 12 वेळा विजयी झाला आहे. 

वाचा : Virat Kohli : विराट कोहली आज अ‍ॅडलेडमध्ये 'हा' विश्वविक्रम मोडणार? केवळ इतक्या धावांची गरज