Pak vs NZ Live, T20 World Cup 1st Semi-Final : सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी20 वर्ल्ड कपमधील हा पहिला उपांत्य सामना असणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघाचं नेतृत्त्वं बाबर आझम करणार असून, केन विलियमसनच्या खांद्यावर न्यूझीलंडची (Pak vs Nz) धुरा असणार आहे.
9 Nov 2022, 13:10 वाजता
LIVE | PAK vs NZ 1st T20 Semi-Final Cricket Live Score & Updates: टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला उपांत्य सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (सी), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन
मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.
9 Nov 2022, 12:12 वाजता
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : न्यूझीलंडच्या संघातील संभाव्य खेळाडू / प्लेइंग 11
फिन एलन, डेवोन कॉनवे, केन विलियमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, टिम साउथी, ईश सोढ़ी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट
9 Nov 2022, 11:53 वाजता
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11
मोहम्मद रिजवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हारिस रऊफ आणि शाहीन आफ्रिदी
9 Nov 2022, 11:49 वाजता
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : भारतासाठीही हा सामना महत्त्वाचा असणार आहे. कारण, भारत इंग्लंडविरोधातील सामना जिंकल्यास अंतिम सामन्यात Pak किंवा Nz चं आव्हान असेल.
Pakistan's attacking batters or New Zealand's efficient bowlers. Who wins the battle at the SCG?
More on #NZvPAK https://t.co/s7Lknee1qg#T20WorldCup pic.twitter.com/j8RJa6aysR
— ICC (@ICC) November 9, 2022
9 Nov 2022, 11:45 वाजता
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : सिडनीच्या मैदानावर मोठ्या धावसंख्येच्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत. जो संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरणार आहे. त्यांच्याकडून खेळपट्टीवर तुफानी फटकेबाजीची अपेक्षा केली जात आहे.
वाचा : PAK vs NZ T20 WC: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड उतरली नव्हती, म्हणाला….
9 Nov 2022, 11:31 वाजता
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : ग्रुप-1 मध्ये अग्रस्थानी असणाऱ्या न्यूझीलंडच्या संघानं आतापर्यंत 5 पैकी 3 सामने जिंकले, तर एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सध्याच्या घडीला NZ चा कर्णधार केन विलियमसनसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं या सामन्यात त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
9 Nov 2022, 11:27 वाजता
New Zealand vs Pakistan T20 World Cup Live : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची सुरुवात फारशी चांगली राहिली नसली तरीही संघानं उपांत्य फेरीत धडक मारली. ही पाकिस्तानच्या संघासाठी आणि खुद्द बाबर आझम याच्यासाठीही एक मोठी संधी ठरणार आहे. त्यामुळं Babar Azam आता या संधीचं सोनं करतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.