मुंबई : जगाच्या पाठीवर असंख्य नागरिक वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवास सुकर होण्यासाठी हवाई मार्गानं प्रवास करण्याला प्राधान्य देतात. पण, तुम्हाला माहितीये ज्या विमानातून तुम्ही प्रवास करता तिथे फ्लाईट अटेंडंटला चुकूनही तुम्ही काही आक्षेपार्ह बोललात तर हे तुम्हालाच महागात पडू शकतं.
विमान संरक्षण नियमांअंतर्गत उडत्या विमानात काही कृती आणि शब्दांचा वापर अत्यंत गंभीर असतो. मस्करीतही जरी तुम्ही या 4 शब्दांचा उल्लेख केलात तर तुम्हाला विमान प्रवासासाठी कायमची बंदी घातली जाऊ शकते.
विमान प्रवासात फ्लाईट अटेंडंटशी बोलून तुम्ही मद्य घेऊ शकता. पण, मद्यधुंद अवस्थेत तुम्ही विमानात येऊ शकत नाही. तुम्ही मस्करीतही ‘मी नशेत आहे’ असं म्हणालात तर याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
मद्यधुंद अवस्थेतील प्रवासी इतरांसाठी धोकादायक ठरु शकतात. यामुळं अशा प्रवाशांना रोखण्यासाठी विमान कंपन्यांचे कठोर नियम आहेत. विमानाचं उड्डाण झाल्यानंतर ही बाब लक्षात आल्यास नजीकच्या विमानतळावर अशा प्रवाशांना उतरवण्यात येतं.
मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्यास अशा प्रवाशांना आर्थिक दंडासोबतच 3 वर्षांच्या शिक्षेचीही तरतुद आहे. अगदीच मोठा प्रसंग ओढावल्यास अशा प्रवाशांवर विमान प्रवासाची बंदीही घालण्यात येते.