निलेश खरमरे, पुणे, झी मीडिया : महाराष्ट्रात अजगर ही जात दुर्मिळ होत चालली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील हवेली कुडजे गावाच्या हद्दीत अजगर सापडल्यामुळे भीतीचे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे अजगर 12 फूट लांबीचे आहे. भारतात अजगर ही जात नष्ट होऊ लागली आहे. भारतीय जातीचे अजगर फक्त गावाजवळ पाहायला मिळतात. (12 feet long python found in pune watch this video nz)
ग्रामस्थांनी वनविभागाला या मोठ्या अजगराची माहिती दिली. पुणे जिल्हा वन्यप्राणी आणि सर्परक्षक असोसियेशनच्या सर्पमित्रांनी, तात्काळ अजगराला शिताफीने पकडून, वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलय. सतत पर्यावणाचा ऱ्हास होत असल्यामुळे वन्य प्राणी निसर्गातून बाहेर पडत आहेत. अन्नाच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्तीकडे वळत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणे आहे हे अजगर याचे उत्तम उदाहरण आहे.
मुळात भारतीय जातीचे हे अजगर हे मानवीवस्तीकडे येण्याचे प्रमाण हे फार कमी आहे. मग हे आजगर कुडजे गावात कसे आले हा आता अभ्यासाचा विषय बनला आहे ..मात्र गावामध्ये एवढा मोठा अजगर आढळल्यानं संपूर्ण पंचक्रोशीतील काहीसे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसियेशन चे सदस्य सर्पमित्र स्वप्नील काकडे, आकाश झोंबाडे, पृथ्वीराज काळे, साहिल केदले, विष्णु कोंडरवाड यांनी या भारतीय अजगर वन विभागाच्या मदतीने अजगराला वन अधिवासात मुक्त केलय.