धक्कादायक ! झोका खेळताना फास लागून मुलाचा मृत्यू

झोका खेळत असताना फास लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा विचित्रप्रकारे लहान मुलाचा जीव गेल्याची ही नाशिकमधील गेल्या दोन महिन्यातील चौथी घटना आहे.

Updated: Mar 5, 2018, 12:14 PM IST
धक्कादायक ! झोका खेळताना फास लागून मुलाचा मृत्यू title=

नाशिक : झोका खेळत असताना फास लागून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशा विचित्रप्रकारे लहान मुलाचा जीव गेल्याची ही नाशिकमधील गेल्या दोन महिन्यातील चौथी घटना आहे.

काय झालं नेमकं?

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. झोका खेळता असताना उमेश मनोहर कुवर या बारा वर्षीय मुलाला खेळत असताना त्याचा झोल गेला आणि दो-याचा फास बसला दुपारी घडलेल्या या घटनेत तातडीने उपचारासाठी रुग्णालायात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्याचा मृत्यू झाल्याच घोषित केल आहे. 

याआधीही धक्कादायक घटना

दोन महिन्यात बालकाचा अपघातात हा चौथा मृत्यू आहे. कधी नाणे, कधी हरभरा तर कधी फुगा घश्यात अडकल्यान बालक मृत्युमुखी पडली आहेत. गेल्याच आठवड्यात उघड्या तारांचा शॉक लागून तर आज पाक अप व्हान्ने उडविल्याने शहरातही एका बालकाचा मृत्यू झाला आहे.