निरा–भिमा नदीजोड प्रकल्प अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत

निरा –भिमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून अपघात झालाय. या अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झालाय.

Updated: Nov 21, 2017, 01:44 PM IST
निरा–भिमा नदीजोड प्रकल्प अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत title=

सातारा : निरा –भिमा नदीजोड प्रकल्पाची क्रेन तुटून अपघात झालाय. या अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झालाय. यात मृत झालेल्या कामगारांना दोन रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामधल्या अकोले इथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पांतर्गत काम सुरु असलाना बोगद्याची क्रेन तुटून, सोमवारी संध्याकाळी आठ कामगारांचा मृत्यू झाला. यातील तीन कामगार उत्तरप्रदेशचे असून, आंध्रप्रदेश आणि ओरिसाचे प्रत्येकी दोन जण आहेत. तर एक कामगार इंदापूरचा आहे. गेल्या काही वर्षांपासून इथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचं काम सुरु आहे. 

या ठिकाणी जमिनीपासून १०० फूट खोल खोदकाम करून बोगद्याच्या आत काम सुरु आहे. जवळपास तीनशे मजूर हे काम करत आहेत. सोमवारी संध्याकाळी आपलं काम संपवून कामगार क्रेनच्या मदतीनं वर येत असताना क्रेन तुटून ही दुर्घटना घडली. कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केलाय. यापूर्वीही या ठिकाणी दुर्घटना घडून अनेकांना अपंगत्व आल्याची तक्रारही त्यांनी केली. कंत्राटदाराच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात असून, त्या अनुषंगानं कारवाई केली जाईल, असं प्रशासनानं स्पष्ट केलंय.