भाजपला मोठा धक्का, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Ulhasnagar NCP News : राष्ट्रवादीने भाजपला (BJP) जोरदार दे धक्का दिला आहे. 

Updated: Oct 27, 2021, 02:16 PM IST
भाजपला मोठा धक्का, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार title=
संग्रहित छाया

ठाणे : Ulhasnagar NCP News : राष्ट्रवादीने भाजपला (BJP) जोरदार दे धक्का दिला आहे. उल्हासनगरमधील ( Ulhasnagar) भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले 22 नगरसेवक आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सर्व नगरसेवक कलानी गटाचे आहेत आहेत. (omi kalani group join ncp) महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा धक्का मानला जात आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, काल राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यानंतर या भेटीत कलानी गटाचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील यावर चर्चा झाली. त्यानुसार हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उल्हासनगर पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले उल्हासनगर महापालिकेतील हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याआधी कलानी यांची सून पंचम कलानी यांनी भाजप नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत भाजपचे एकूण 40 नगरसेवक असून त्यापैकी ओमी कलानी गटाचे 22 नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकणार नाही. तसेच भाजपला या नगरसेवकांना व्हिप देखील जारी करता येणार नसल्याने 22 नगरसेवकांवर अपात्रेची टांगती तलवार नसरणार आहे.