मुंबईत CSMT स्थानकाबाहेर तरुणीवर सामूहिक बलात्कार; आळीपाळीने करण्यात आला अत्याचार

मुंबईत 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात ही घटना घडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 4, 2024, 03:53 PM IST
मुंबईत CSMT स्थानकाबाहेर तरुणीवर सामूहिक बलात्कार; आळीपाळीने करण्यात आला अत्याचार title=

Mumbai Crime News: मुंबईत 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (Chhatrapati Shivaji Maharaj Terminal) परिसरात हा प्रकार घडला आहे. 22 सप्टेंबरला महिलेवर बलात्कार करण्यात आला असून, आता घटना उघडकीस आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे आपल्यावर बलात्कार झाला असा आरोप महिलेने केला आहे. 

22 सप्टेंबरला महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर एकटी असताना दोन अज्ञात व्यक्तींनी तिला गाठलं. यावेळी एका आरोपीने आरडाओरड करु नये यासाठी तिचं तोंड दाबलं. यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या टॅक्सी स्टँडच्या मागे नेऊन आळीपाळीने तिच्यावर बलात्कार करण्यात आला असा महिलेचा आरोप आहे. 

महिलेने याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान लोहमार्ग पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग केलं आहे. 

पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्कार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बस चालकाने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता पुण्यात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. नंतर तरुणीचे अपहरण करण्यात आले. तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. 

पीडित तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी 10 पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले आहेत.