अशी वेळ कुणावरच येवू नये; बापाच्या डोळ्यादेखत 3 लहान लेकरांचा मृत्यू

सुट्टी असल्याने तिन्ही भावडं वडिलांसोबत खरेदीसाठी निघाले होते. वडिलांच्या बाईकवरुन ते मार्केटमध्ये जात होते. यावेळी अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Jun 25, 2023, 10:48 PM IST
अशी वेळ कुणावरच येवू नये; बापाच्या डोळ्यादेखत 3 लहान लेकरांचा मृत्यू  title=

Jalna Accident: बापाच्या डोळ्यादेखत 3 लहान लेकरांचा मृत्यू झाला आहे. भीषण अपघातता एका पित्याने आपली तीन लहान मुल गमावली आहेत. ही तीनही मुल 3 ते 7 वर्षे वयोगटातील आहेत. जालना येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत मुलांचे वडिल देखील गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मंठा चौफुली येथे हा अपघात झाला आहे.  3 वर्षीय आदबिया फातेमा, 5 वर्षीय आयेजा फातेमा आणि 7 वर्षीय नुरेन फातेमा या मुलांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर, या मृत मुलांचे वडिल सय्यद शोएब हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 

कसा झाला अपघात?

जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ हा अपघात झाला. रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे आपल्या मुलीसोबत दोन भाच्यांना घेऊन डी मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मोटारसायकलवर पुढे एक मुलगी आणि मागे दोन मुले बसली होती.  यावेळी  मंठा चौफुली येथे यांच्या बाईकला पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली आहे. या धडकेत तिघा भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर, या मुलांचे वडिल या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जालना शहरातील मंठा बायपासवर ही घटना घडली. यांच्या बाईकला धडक देणाऱ्या आयशरच्या ड्रायव्हर अपघातानंतर घटनास्थलावरुन फरार झाला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सय्यद शोएब यांच्या डोळ्या देखत तीन मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.