नाशकात भाजीपाल्याची पाच कोटींची उलाढाल ठप्प

Updated: Sep 10, 2018, 04:17 PM IST

नाशिक : आजच्या भारत बंदमुळे नाशिक जिल्ह्यातून जाणारा भाजीपाला नाशिकमध्येच ठप्प झाला आहे...मुंबई मराठवाडा गुजरात मध्य प्रदेश परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्याला कमी भाव मिळतो आहे संस्थानिक पातळीवर खरेदी सुरू असली तरी माल नाशवंत असल्याने व्यापारी भाव पाडून मागत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आजची सुमारे पाच कोटींची उलाढाल ठप्प झालीये तर या बंदचा परिणाम पुण्याच्या एपीएमसी मार्केटवर झालेला नाही.

व्यवहार सुरुळीत 

सर्व पाचही मार्केट सुरू आहेत. भाजीपाला मार्केटलमध्ये ५८० ते ६०० गाड्यांची आवक झालेली आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून भाज्या एपीएमसीमध्ये आल्यायत तर दादरच्या भाजीपाला मार्केटमध्येही सकाळपासून व्यवहार सुरुळीत आहेत. भाजीपाला बाजारात सकाळापासूनच संपूर्ण महाराष्ट्रतून भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक झालीय.