गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 15, 2017, 08:19 AM IST
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी title=

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

याआधी रेल्वेनं १४२ जादा फेऱ्यांची घोषणा केली होती. पनवेल ते सावंतवाडी, कुर्ला टर्मिनस-एलटीटी ते करमाळी आणि मुंबई ते चिपळूण या मार्गावर या गाड्या चालणार आहेत. 

मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून दरवर्षी गणेशोत्सवासाठी जादा फे-या सोडल्या जातात. आता आणखी ६० जादा फेऱ्यांची घोषणा केल्यानं आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

१९ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान पनवेल-सावंतवाडी विशेष ट्रेन दर शनिवारी संध्याकाळी ७.३५  मिनिटांनी सुटेल. आणि सावंतवाडील दुस-या दिवशी पहाटे ४.२० मिनिटांनी पोहोचेल. मध्य रेल्वेनं पहिल्यांदा पनवेल-सावंतवाडी ही विशेष गाडी सोडली आहे. त्यामुळे पनवेल आणि त्यापुढील प्रवाशांना एक नवा पर्याय उपलब्ध झालाय.