साताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्ग

साता-यातील वाईच्या गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा घातलाय. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

वनिता कांबळे | Updated: Aug 2, 2024, 09:12 PM IST
साताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्ग  title=

Satara Wai Ganpati Temple : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशात सातारा जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. याचा फटका साताऱ्याच्या वाई येथील  प्रसिद्ध गणपती मंदिराला बसला आहे.  वाई येथील  प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गणपतीच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहचले आहे. 

वाईचे प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केल्याने कृष्णा नदीचा पाणी पातळीत वाढ झाली आहे.  त्यामुळे कृष्णा नदीच्या काठी असलेले हे गणपती मंदिर पुराच्या पाण्यात वेढले गेले आहे. एवढेच नाही तर या मंदिराचा आत मध्ये असलेली गणपती बाप्पाचा मूर्तीला देखील या पाण्याचा वेढा पडला आहे.सध्या धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.

राज्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालाय...यंदा 453 मिमी पावसाची नोंद झालीये... सरासरीत 1.8 टक्के इतकी वाढ झालीये...येत्या दोन महिन्यात मराठवाडा,विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यताय... तर कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे...