बनावट बंदूकीच्या धाकावर सोनाराला लुटले; पोलिसांनी लावला डोक्याला हात

नेकलेस नावाच्या ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली आहे. एका चोरट्याने नकली बंदूक दाखवून सोनाराला लुटल्याची घटना समोर आली आहे. 

Updated: Nov 27, 2022, 12:00 AM IST
बनावट बंदूकीच्या धाकावर सोनाराला लुटले; पोलिसांनी लावला डोक्याला हात title=

प्रथमेश तावडे, वसई, झी मीडिया :  बनावट बंदूकीच्या धाकावर सोनाराला लुटले आहे. नालासोपारा पश्चिमेच्या(Nalasopara West) पाटणकर पार्क येथे ही चोरी झाली आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे(Crime News). 

नेकलेस नावाच्या ज्वेलर्स दुकानात ही चोरी झाली आहे. एका चोरट्याने नकली बंदूक दाखवून सोनाराला लुटल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास बनावट बंदूक घेऊन आलेल्या चोरट्याने ज्वेलर्स चालकाला बंदूकीचा धाक दाखवला. बंदुकीच्या धाकावर दुकानातील 15 तोळे घेऊन तो पसार झाला.

दुकानात सिसिटीव्ही कॅमेरा बंद असल्याने चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली नाही. मात्र, भर दुपारी घडलेल्या या प्रकाराने ज्वेलर्स व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ज्वेलर्स चालकाने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात अद्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.