पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: नागपुरातील अंबाझरी तलावात चक्क पाण्यात तरंगणारा दगड (Floating stone) दिसुन आलाय. सध्या यामुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. पाण्यात दगड तंरगतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. या संदर्भात जेव्हा आम्ही व्हिडीओचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा हा व्हिडीओ नागपुरातील (nagpur) जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांचाच आहे. (a man found suspicious floating stone in nagpur lake video goes viral)
सध्या सोशल मीडियावर (social media viral) व्हायरल होत असणाऱ्या हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. यात व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की तो पाण्यात फेकल्यावर हा दगड पाण्यात बुडत नाही तर पाण्याचा वरच्या भागावर येऊन तरंगतोय. संजय बाटवे (sanjay batave) ह्यांना जेव्हा हा दगड अंबाझरी तलावात काठावर पाण्यात तरंगताना दिसून आला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी तो पुन्हा तो दगड पाण्यात पुन्हा फेकला तर काय तो दगड पुन्हा तरंगलायला लागलाय. त्यामुळं कुतूहलापोटी संजय बावटेंच्या मित्रांनीच तो व्हिडिओ बनवलाय आणि एका व्हॅटसअँप ग्रुपवर टाकला आहे. मग काय तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि एकच चर्चा रंगू लागली.
छठ पूजेच्या दोन दिवसांपूर्वी अंबाझरी तलाव(Amazari Lake) परिसरात साफ सफाई करण्यात आली आहे. तेव्हा हा दगड संजय बाटवेना मिळाल्याचं ते सांगतात. हा दगड अंदाजे पाच ते सहा किलोचा असावा. यानंतर यामागे पौराणिक कथापासून शास्त्रीय कारण आल्याचा चर्चा रंगू लागल्या. पण दगडं तरंगत असला तरी काही जादू नसून दगडाच्या आतील भागात पोकळी निर्माण झाली असावी म्हणून हा दगड तरंगत असल्याचं संजय बाटवे सांगतात. तेच नागपूर विद्यापीठाच्या भूगर्भ शास्त्राचे विभाग प्रमुख कीर्तीकुमार रणदिवे काय सांगतायत यामागचं सत्य ते ही जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
जमिनीच्या भूगर्भातून लावारसमधून अनेक पदार्थांमध्ये बाहेर पडतात. यात राख, लावा, फेस, निघतोय. यातील फेसही जाडा असतो. तो फेस शांत होतो आणि थर असतो त्यात जर अल्युमिनियम या सिलिकॉन असल्यास त्या दगडाला प्युमिस दगड (pumis) तयार होतो. त्या गुणधर्ममुळे तो तरंगतो. पण पण असा कुठलाही दगड मिळून आल्यास त्याचा सोर्स निश्चित असला तरच त्याबद्दल काही सांगता येईल जर सोर्स निश्चित असेल तर फारसं त्यावर बोलणं योग्य नाही.
मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!
खरंतर हा दगड नागपूरच्या तलाव परिसरात कसा आला यावर संशोधन होण्याची गरज होतीय. त्यानंतरच या दगड पाण्यात तरंगण्याचं रहस्य उलगडलं असतं. पण संजय बाटवे ह्यांनी हा दगड याच काठावर ठेवल्यान येणाऱ्या जाण्याऱ्याची वर्दळीत कोणीतरी उचलून नेला असावं असं बोललं जातं आहेय. त्यामुळं या पाण्यात तरंगत असल्याचं रहस्य उलगडण्यापूर्वीच तो दगड कोणीतरी उचलून नेलाय. त्यामुळं हा दगड नेणारा तरी कोण हेच नवीन रहस्य बनलय.