पेंचच्या वाघिणीच्या गळ्यात आढळला फास

शिकरांच्या सक्रियतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Updated: Jan 28, 2022, 10:19 AM IST
पेंचच्या  वाघिणीच्या गळ्यात आढळला फास title=

नागपूर- पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघिणीच्या गळ्यात शिकारीच्या सापळा आढळल्याने व्याघ्र प्रकल्प प्रशासनात खळबळ उडाली आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीच्या गळ्यात फास असल्याचे छायाचित्र आले आहे. यामुळे भागांची सुरक्षा आणि शिकाऱ्याची सक्रियता हा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरतेने पुढे आला आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वन क्षेत्रात मायकेपार कक्षात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये 26 जानेवारीला छायाचित्राची तपासणी करताना  टी 41 या वाघिणीच्या गळ्यात शिकारीचा सापळा अडकला असल्याचे दिसून आले . या ठिकाणापासून शेत जमीन एक किलोमीटर अंतरावर असल्याने मागील कॅमेरा ट्रॅपचा छायाचित्र तपासले असून ती वाघीण पश्चिम पेंच सालेघाट नागलवाडी या पर्वत रांगातून जात असल्याचे आढळले आहे.

यामुळे गावकऱ्यांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. गाव परिसरात वाघीण आढळल्यास अफवा थांबविण्याकरिता तसेच वाघिणीला शोधण्याकरिता समिती गठित करण्यात आला आहे. या समितीत गावातील सरपंच, पोलिस पाटील,पर्यावरण समिती अध्यक्ष आहे.तसेच याकरता व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

तसेच वाघिणीचा शोध घेण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने अधिक कॅमेरा ट्रॅप बसवले आहेत.वाघिणीचा  माग घेण्यासाठी एकूण नऊ गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत.  शेत-शिवार जंगल क्षेत्रात पथक वाघिणीचा शोध घेत आहे. नागपूर प्रादेशिक विभागालाही सतर्क करण्यात आले असून पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासन टी 41 या वाघिणीला शिकारीचा सापळा अडकल्याने  तिला काही झाले तर नाही ना याचा शोध व्याघ्रप्रकल्पची टीम घेत आहे.